नांदेड/पैठण, प्रतिनिधी| जायकवाडी धरण (नाथसागर जलाशय) येथून आज दि. 4 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 5.00 ते 6.00 वाजेदरम्यान धरणाच्या सांडव्याद्वारे गोदावरी नदीपात्रात 10,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.


धरणात होणाऱ्या पाण्याच्या आवकेनुसार या विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार वाढ अथवा घट करण्यात येऊ शकते, अशी माहिती जायकवाडी पाटबंधारे विभागाने दिली आहे.


प्रशासनाने नागरिकांना गोदावरी नदीपात्रात प्रवेश न करण्याचे आवाहन केले असून नदीकाठच्या सर्व गावांतील नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे सांगितले आहे. संभाव्य पाणीपातळीत वाढ लक्षात घेऊन कोणतीही जीवित किंवा वित्तहानी होणार नाही यासाठी दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



जायकवाडी पाटबंधारे विभागाचे आवाहन : गोदावरी नदीपात्रात प्रवेश करू नये. नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे.

