नांदेड| नांदेड दक्षिण मतदार संघातील नागरिकांच्या समस्या सोडण्याचे माझे कर्तव्य असून, मी आमदार नसून जनतेचा सेवक म्हणून काम करतो. त्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विलंब न लावता त्यांचे प्रश्न तात्काळ सोडावे. अन्यथा त्यांचे परिणाम भोगावे लागतील असे खडे बोल आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांनी सोनखेड येथे जनता दरबारच्या वेळी बोलताना व्यक्त केले.


दिनांक 31 मे रोजी बाजार मैदान सोनखेड येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराज शिबिर व जनता दरबार घेण्यात आला. या अभियानाला तहसीलदार विठ्ठल परळीकर गटविकास अधिकारी दशरथ आडे राघो वीजवितरणचे उपकार्यकारी अभियंता सुतार जि प चे बांधकाम विभागाचे उप अभियंता शिवाजी राठोड तालुका आरोग्य अधिकारी जगदीश कांबळे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने वीज वितरणचे सहाय्यक अभियंता सुदर्शन गव्हाणे ग्रामविकास अधिकारी संदीप कच्छवे महसूल मंडळा अधिकारी तानाजी सुगावे, ग्राम महसूल अधिकारी नेताजी रायाजी, वन विभागाचे मुंडे, शिवसेना तालुका प्रमुख उद्धव शिंदे, अशोक मोरे, उपसरपंच सुनील मोरे, बालाजी भायगावकर, सुहास खराणे आधीसह संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना आमदार आनंदराव भंडारकर म्हणाले की, अधिकारी व नागरिकांचा संवाद समोरा समोर झाला पाहिजे. त्यांच्या अडचणीचे निवारण झाले पाहिजे त्यासाठी हा जनता जनता दरबारचा हेतू असून जनतेच्या अडचणी काय असतात याची जाणीव मला आहे. समस्या छोट्या असो किंवा मोठ्या यातून सुटल्या पाहिजे प्रलंबित प्रश्न यातून मार्गी लावू शकतात. त्यासाठी संबंधित विभागाने नागरिकांना जाणूनज बुजून त्रास देता कामा नये. जर कामात कुचराहीपणा दिसला तर त्यांची गय केली जाणार नाही. असे ठामपणे सांगून त्यांनी 1990 पासून रखडलेला सायाळ या गावाचा रस्त्याचा प्रश्न होता तो प्रश्न कर्तव्यदक्ष तहसीलदार विठ्ठल परळीकर व पोलीस निरीक्षक आयलाने या जोडीने सोडवला त्यांच्या कार्याचा मला अभिमान आहे. या बहाद्दर जोडीचा सत्कार आमदार बोंढारकर यांनी केला.

तहसीलदार विठ्ठल परळीकर म्हणाले शेतकऱ्यांनी शेती धोरण महत्त्वाचा समजून ॲग्री टॅग फार्मर आयडी काढून घ्यावे तालुक्यात 50 टक्के लोकांनी काढला आहे. बाकी शेतकऱ्यांनी विलंब न लावता काढून घ्यावे नाहीतर शासनाच्या विविध योजना त्यात पीएम योजना पिक विमा अतिवृष्टी बाधित जमीन व पिके यांचा लाभ मिळणार नाही. पांदण रस्ते शूरस्ते वादविवाद न करून समन्वयाने सुटले पाहिजे त्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. माझ्या संकल्पनेतून विविध प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन फॉर्म दाखल केलेल्यांना व्हाट्सअप द्वारे दिलेल्या कालावधी मध्ये आपल्या मोबाईल ॲप मध्ये बघू शकता. जर अडचणीचे काम पडल्यास ताबडतोब काढून घेऊ शकता त्यासाठी आर्थिक व वेळ वाचू शकतो. प्रास्ताविकार मंडळ अधिकारी तानाजी सुगाव्याने रहिवासी शालेय प्रमाणपत्र आधार ही केवायसी घरकुलासाठी पाच ब्रास रेती मोफत घरबसल्या प्रमाणपत्र आदींची सविस्तर माहिती यावेळी सांगितले.

कृषी विभागाच्या तक्रारीचा पाऊस
या जनता दरबाराच्या मध्ये वीज वितरण व कृषी विभाग यांच्या जास्त तक्रारी दिसून आल्या. त्यांच्या तक्रारीची दखल आमदार भंडारकर यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना कामे का होत नाही विलन का होतय असे विविध प्रश्नाचा भडिमार केल्याने संबंधित अधिकाऱ्यांना घाम पुसण्याचे वेळ आली.