MLA Bondharkar : अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विलंब न लावता नागरिकाचे प्रश्न सोडवा…. आमदार बोंढारकर
नांदेड| नांदेड दक्षिण मतदार संघातील नागरिकांच्या समस्या सोडण्याचे माझे कर्तव्य असून, मी आमदार नसून जनतेचा सेवक म्हणून काम करतो. त्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विलंब न लावता त्यांचे प्रश्न तात्काळ सोडावे. अन्यथा त्यांचे परिणाम भोगावे लागतील असे खडे बोल आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांनी सोनखेड येथे जनता दरबारच्या वेळी बोलताना व्यक्त केले.
दिनांक 31 मे रोजी बाजार मैदान सोनखेड येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराज शिबिर व जनता दरबार घेण्यात आला. या अभियानाला तहसीलदार विठ्ठल परळीकर गटविकास अधिकारी दशरथ आडे राघो वीजवितरणचे उपकार्यकारी अभियंता सुतार जि प चे बांधकाम विभागाचे उप अभियंता शिवाजी राठोड तालुका आरोग्य अधिकारी जगदीश कांबळे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने वीज वितरणचे सहाय्यक अभियंता सुदर्शन गव्हाणे ग्रामविकास अधिकारी संदीप कच्छवे महसूल मंडळा अधिकारी तानाजी सुगावे...
