नवीन नांदेड l सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने आयोजित सामान्य ज्ञान,लेझीम , रांगोळी , निबंध स्पर्धातील विजयी स्पर्धकांना पारितोषिक वितरण हडको येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे 19 फेब्रुवारी रोजी सन्मान प्रमाणपत्र व रोख बक्षिसे देऊन करण्यात आला.


नवीन नांदेड सिडको येथे१९ फेब्रुवारी रोजी विविध विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण हडको येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या ठिकाणी शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष त्र्यंबक कदम , शिवसेना दक्षिण जिल्हाप्रमुख विनय पाटील गिरडे, पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर,संजय पाटील घोगरे, उदय देशमुख, जनार्दन गुपीले,सतीश बसवदे, संकेत पाटील, संजय इंगेवाड, सिद्धार्थ गायकवाड,डॉ.करुणा जमदाडे, डॉ. अशोक कलंत्री, डॉ. अशोक भिसे, भगवान ताटे, जयवंतराव काळे, साहेबराव गाडे, उत्तमराव जाधव,सुभाषसूर्यवंशी, हनुमंतराव कदम, डॉ.बी.एस.ढगे, डॉ. अनिल सातारकर, प्रमोद टेहरे, दिलीप कदम,संजय जाधव, दिगंबर शिंदे.

साहेबराव मोरे, विनोद वंजारे ,दीपक भरकड, मधुकर गायकवाड, संदीप कदम, वसंत कदम, राजू लांडगे, ना.ही.ऊमाटे ज्योती कदम, संतोष एकलारे, गजानन शिंदे विश्वास हंबर्डे, प्रमोद टेकाळे, बालाजी हिवराळे, महेश शिंदे, नामदेव चव्हाण, व सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व शिवप्रेमी बांधव यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

रांगोळी स्पर्धा घेण्यात हडको छत्रपती शिवराय पुतळा व सिडको येथील छत्रपती शिवराय पुतळा या ठिकाणी रांगोळी स्पर्धा घेण्यात आली यामध्ये रांगोळी स्पर्धेत प्रथम क्र. आनंदी वैजवाडे द्वितीय क्र. राही गवारे, तृतीय क्र. पूजा गायकवाड, सामान्य ज्ञान स्पर्धा माध्यमिक गटात प्रथम मिथिलेश नरवाडे, द्वितीय रुपेश भोकरे,तृतीय कार्तिक गवळी व कृष्णा जाधव, सामान्य ज्ञान स्पर्धा प्राथमिक गट साक्षी लोंढे,साईराज घोरबांड, सुमित लोंढे, निबंध स्पर्धेमध्ये विजेते भक्ती गव्हाणे समृद्धी कोंडावार साईराज घोरबांड यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.

लेझीम स्पर्धेत प्रथम क्रमांक इंदिरा गांधी हायस्कूल हडको व कुसूमताई विघालय सिडको यांना तर दिव्तीय जिजाऊ ज्ञान मंदिर,तृतीय छत्रपती शिवाजी विद्यालय हडको यांच्या काढण्यात आला आहे.
सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती यांच्या वतीने काढण्यात आलेल्या मिरवणूक मध्ये खा. रवींद्र चव्हाण,आ.आनंदराव बोढारकर, बाबासाहेब शिंदे, विठ्ठल पावडे, उद्धव ढगे, यांनीही शोभायात्रेत सहभागी होऊन शुभेच्छा दिल्या, अध्यक्ष त्र्यंबक कदम यांनी सर्वांचेच आभार मानले.