CIDCO ; सिडको शिवजन्मोत्सव निमित्ताने आयोजित विविध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीसाचे वितरण
नवीन नांदेड l सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने आयोजित सामान्य ज्ञान,लेझीम , रांगोळी , निबंध स्पर्धातील विजयी स्पर्धकांना पारितोषिक वितरण हडको येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे 19 फेब्रुवारी रोजी सन्मान प्रमाणपत्र व रोख बक्षिसे देऊन करण्यात आला.
नवीन नांदेड सिडको येथे१९ फेब्रुवारी रोजी विविध विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण हडको येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या ठिकाणी शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष त्र्यंबक कदम , शिवसेना दक्षिण जिल्हाप्रमुख विनय पाटील गिरडे, पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर,संजय पाटील घोगरे, उदय देशमुख, जनार्दन गुपीले,सतीश बसवदे, संकेत पाटील, संजय इंगेवाड, सिद्धार्थ गायकवाड,डॉ.करुणा जमदाडे, डॉ. अशोक कलंत्री, डॉ. अशोक भिसे, भगवान ताटे, जयवंतराव काळे, साहेबराव गाडे, उत्तमराव जाधव,सुभाषसूर्यवंशी, हनुमंतराव कदम, डॉ.बी.एस...
