नांदेड l ड्रेनेजचे दोनवेळा कम करून, एक हजार रुपये गटारात घातले,त्यांचे १६० कोटी रुपये व्याज नांदेड वासियांवर का ?या मागण्यासाठी आमरण उपोषण कारण्याचा निर्णय घेण्यात आला.


भीम प्रहार बैठक श्याम निलंगेकर यांच्या अध्यक्ष तेखाली घेण्यात आली.१४ ऑक्टॉबर पासुन नांदेड वाघाळा शहर महानगर पालिका कार्यालया समोर होणाऱ्या अमरण उपोषणाबाबत विस्तारणे चर्चा करण्यात आली.


गुरू ता गद्दी कार्यक्रमात ड्रेनेजच्या कामावर पाचशे कोटी पेक्षा जास्त रुपये खर्च केला व पुन्हा त्याच कामावर पाचसे कोटी रुपये खर्च केला.आणि एक हजार कोटी रुपये खर्च करूनही ड्रेनेजच्या कामात काहीच प्रगती नाही. वरून नांदेड वासियांना प्रति वर्षी १६० कोटी रुपये व्याज भराव लागत आहे. यांस सर्वस्वी जबाबदार अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम असून संपूर्ण ड्रेनेज कामाची स्वातंत्र चौकशी करण्यात यावी, दोषी अधिकाऱ्यावर कार्यवाही करावी असी भीम प्रहारची मागणी आहे.


आज झालेल्या बैठकीस अमरण उपोषणकर्ते प्रकाश वाघमारे,काकासाहेब डावरे,अमोल पट्टेवाड,रवी चित्ते,अशोक शिवभक्ते यांची उपस्थिती होती.



