नांदेड| श्रीसदुरू दमया स्वामी जंगममठ संस्थान संचालित श्रीक्षेत्र मन्मथधाम संस्थांनाचे प्रेरणा व श्रद्धास्थान, म हातपस्वी ३२ वे मठाधिपती त्रिकाल पूजानिष्ठ, ष.ब्र.१०८ श्री सदुरु श्री पंचाक्षर शिवाचार्य महास्वामीजी यांच ११८ वे जन्मोत्सवानिमित्त सानिध्य व अमृत शुभहस्ते श्रीमद काशी ज्ञानसिंहासनाधीश्वर श्री श्री श्री १००८ जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी काशी यांचे दि. १६ जानेवारीला शेगाव (Shegaon) येथे दुपारी २ वाजता आगमन, तीन वाजता वीरशैव भक्त निवास, श्री पंचाक्षरमन्मथधाम मंदिर भूमीपूजन दुपारी ३. ०५ वाजता आणि दि. १७ जानेवारीला सकाळी ८. ३० वाजता मिरवणूक व शोभायात्रा व त्यानंतर सन्मान सोहळा असा काशी जगदुरुंचे दिव्य सानिध्य लाभणार आहे.

याप्रसंगी अध्यक्ष श्री ष.ब्र. १०८ श्री सद्गुरू डॉ. विरूपाक्ष शिवाचार्य, श्रीसद्गुरु दमयास्वामी जंगममठ संस्थान, बाळापूर, कपिलाधर, संभाजीनगर श्रीगुरुपंचाक्षर जंगममठ संस्थान अकोला यांच्या वतीने आणि आदरणीय शिवाचार्य यांच्या उपस्थितीत.. प पू श्री ष ब्र श्रीकंठ शिवाचार्य स्वामीजी, नागन्सूर, नीलकं ठ शिवाचार्य स्वामीजी, मैंदर्गी, सोमलिंग शिवाचार्य स्वामीजी, बिचकुंदा, सिद्धदयाल शिवाचार्य स्वामीजी बेटमोगरा, पंडिताराध्य शिवाचार्य स्वामीजी वाडागली, महादेव शिवाचार्य स्वामीजी वाईकर, दिगंबर शिवाचार्य स्वामीजी, सिद्ध चैतन्य शिवाचार्य स्वामीजी, साखरखेर्डा स्वामीजींच्या दिव्य सानिध्यात दि. १७ जानेवारी २०२५, शुक्रवार रोजी, जि.प. कर्मचारी भवन, अकोला येथे सकाळी वाजता होणाऱ्या सोहळ्यास खासदार अनुप धोत्रे, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार रणधीर सावरकर, आमदार हरिष पिंपळे, अनुप गुप्ता, डॉ. रविकांत कोल्हे, फनिंद्र महाजन या मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

या समारंभामध्ये आजवर धार्मिक, साहित्यिक, सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय, उद्यागिक, व्यापार क्षेत्रात व सर्व लौकिक अलौकिक क्षेत्रात कार्य केलेल्या व खूप मोठे योगदान दिलेल्या विविध क्षेत्रातील जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, डॉ. शामा घोणसे, श्रावण जंगम, बाबासाहेब कोरे, शारदा एकघरे, डॉ. उदय सांगळोदकर, लता कोल्हे, प्रा. दीपाली सोसे, शिवप्रसाद जटाले यांच्यासह अनेक मान्यवरांचा राज्यस्तरीय वीरशैव श्री सेवारत्न पुरस्कार-२०२५ (Seva Ratna Award – 2025) हा सन्मान देऊन गौरव करण्यात येणार आहे.

श्रद्धा, एकनिष्ठेने देश व धर्मो न्नती करिता सेवा करीत असलेल्या सर्वांनायाभव्य मिरवणूक, शोभायात्रा व सन्मान कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजन समितीने केले आहे. या कार्यक्रम पंचाक्षराला वीरशैवाचार्य, ज्ञानतपोरत्न, वेदांताचार्य, शिवाचार्यरत्न, श्री १०८ ष.ब्र. सद्गुरु डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महास्वामीजी श्रीक्षेत्रमन्म थधाम संस्थान यांचेही मार्गदर्शन व आशीर्वचन लाभणार आहे, अशी माहिती आयोजन समितीच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविली आहे.
