Bhoomipujan ceremony : श्रीक्षेत्र शेगांव येथे १६ जानेवारी रोजी पंचाक्षर मन्मथधाम मंदिराचा भूमीपूजन सोहळा
नांदेड| श्रीसदुरू दमया स्वामी जंगममठ संस्थान संचालित श्रीक्षेत्र मन्मथधाम संस्थांनाचे प्रेरणा व श्रद्धास्थान, म हातपस्वी ३२ वे मठाधिपती त्रिकाल पूजानिष्ठ, ष.ब्र.१०८ श्री सदुरु श्री पंचाक्षर शिवाचार्य महास्वामीजी यांच ११८ वे जन्मोत्सवानिमित्त सानिध्य व अमृत शुभहस्ते श्रीमद काशी ज्ञानसिंहासनाधीश्वर श्री श्री श्री १००८ जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी काशी यांचे दि. १६ जानेवारीला शेगाव (Shegaon) येथे दुपारी २ वाजता आगमन, तीन वाजता वीरशैव भक्त निवास, श्री पंचाक्षरमन्मथधाम मंदिर भूमीपूजन दुपारी ३. ०५ वाजता आणि दि. १७ जानेवारीला सकाळी ८. ३० वाजता मिरवणूक व शोभायात्रा व त्यानंतर सन्मान सोहळा असा काशी जगदुरुंचे दिव्य सानिध्य लाभणार आहे.
याप्रसंगी अध्यक्ष श्री ष.ब्र. १०८ श्री सद्गुरू डॉ. विरूपाक्ष शिवाचार्य, श्रीसद्गुरु दमयास्वामी जंगममठ संस्थान, बाळापूर, कपिलाधर, संभा...
