उस्माननगर । भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टीचे पंचायतराज व ग्रामविकास विभाग मराठवाडा सह -संयोजक तथा ग्रामपंचायत सदस्य शिवशंकर काळे यांनी येथील गोरगरीब व दिव्यांग नागरिकांना थंडीपासून बचाव करण्यासाठी ब्लॅकेटचे वाटप करत मायेची ऊब दिली आहे. सध्या ग्रामीण भागात थंडीची लाट पसरत असल्याने गोरगरीब व दिव्यांग नागरिकांना थंडीपासून बचाव करण्यासाठी ब्लॅकेटचे वाटप करण्यात आले.

शिवशंकर काळे हे पंचक्रोशीत उल्लेखनीय कामगिरी करताना पक्षाचे कार्यकर्ते म्हणून समजात वेगळी ओळख निर्माण केली आहे. मागील दहा ते पंधरा वर्षांपासून ग्रामपातळीवर राहून गोरगरीब नागरिकांचे समाजकार्य करतात. शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. आज परिसरात नागरिकांची जवळकीता वाढलेली आहे.

दि.१३ जानेवारी रोजी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ब्लॅकेटचे वाटप करून मायेचा आधार दिला आहे त्याच्या या उपक्रमा बद्दल नागरिकांनी आभार मानले आहे. समाजातील दुर्लक्षित वर्गाकडे भाजपाचे पंचायतराज व ग्रामविकास विभाग मराठवाडा सह -संयोजक तथा ग्रामपंचायत सदस्य शिवशंकर काळे यांनी वाटप केले आहे.
