नवीन नांदेड l नांदेड जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या शाखा सिडको यांच्या वतीने सिडको वृत्तपत्र विक्रेता टिनशेड येथे 12 जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ यांना महिला वितरक वंदना लोणे यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी राजा माता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले, प्रारंभी महिला वितरक वंदना लोणे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला, यावेळी नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश ठाकूर, पत्रकार तिरूपती पाटील घोगरे,गणेश डोळस ,जेष्ठ वितरक शेख सयोध्दीन, दौलतराव कदम, संघटनेचे अध्यक्ष सतिश कदम, बालाजी सुताडे,अमोल नांदेडकर,राम धांवडे, यांच्या सह वृत्तपत्र विक्रेते उपस्थित होते.
