नांदेड l नवीन कौठा येथील कुशी नगर मध्ये मोठ्या संख्यने दलित समूहातील लोकं वास्तव्यास असुन तेथे नाली, ड्रेनेज आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबीत आहे.

राष्ट्रीय कलाल गौड तेलंग समाज युवा संघर्ष समितीचे राज्य अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते सुनील अनंतवार व त्यांच्या सोबत असलेले नवीन कौठा येथील युवक जय लव्हाळे, जळबाजी सोनकांबळे, राहुल हैबते,उत्तम कांबळे, सचिन कांबळे,योगेश भुतके ,भैय्यासाहेब दुंडे यांनी मागील दोन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला असून त्यांच्या पाठपुराव्यास यश येताना दिसत आहे.

अनंतवार यांनी महापालिकेवर घागर मोर्चा काढण्याचा इशारा दिल्यामुळे आणि यापूर्वी निवेदने दिल्याने मनपाच्या मलनिस्सारण आणि पाणी पुरवठा विभागाने दखल घेतली आहे. कार्यकारी अभियंता संघरत्न सोनसळे यांनी तसे लेखी पत्र संबंधित विभागाच्या त्यांच्या अधिनिस्त उप अभियंत्यांना व इतर यंत्रणाना दिले आहे.

सुनील अनंतवार यांनी कुशी नगर व म्हाडा कॉलनी येथील सि.सी नाली, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, तसेच नवीन ड्रेनेज लाईन टाकण्याचा विषय व पथदिवे,,कचऱ्याचे व्यवस्थापन असे अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले आहेत.

पुढील पंधरा दिवसात दलित वस्तीतील प्रश्न सुटले नाही तर घागर मोर्चा सह बेमुदत धरणे आंदोलन
नांवाशमनपा समोर करण्याचा विचार असल्याचे अनंतवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.