Homeनांदेडinspection by seniors : शहापूर कोटेकलुर डाबरीकरणाचे काम निकृष्ट; वरिष्ठानी पाहणी करण्याची...

inspection by seniors : शहापूर कोटेकलुर डाबरीकरणाचे काम निकृष्ट; वरिष्ठानी पाहणी करण्याची मागणी

देगलूर, गंगाधर मठवाले| तालुक्यातील मौजे शहापूर कोटेकलुर या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम चालू असून, रस्ता मजबुती साठी लागत असलेले मटेरील कमी प्रमाणात वापर केल्याने रस्ता खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केवळ चोवीस तासात उकडून रस्त्याची दयनीय अवस्था होते आहे.

ग्रामीण भागातील रस्ता करण्यासाठी जनतेनी आमदार खासदार नेतेमंडळींनी खेटा मारुन रस्ता मजबुतीचे काम मजूर करून आणावे लागते. तेव्हा रस्ताचे काम मिळते एक वेळा रस्त्याला निधी मिळाला कि वीस एक वर्षे तरी रस्तावरुन वाहनाना जाण्यासाठी कसल्याच प्रकारे ञास होणार नाही असे शासनाचे धोरण असते. मात्र या सर्व नियमन धाब्यावर बसून गुतेदारानी कमी प्रमाणात गिटी मुरुम डाबर वापरुन थातूर माथूर रस्ता बनविण्याचा सपाट सुरूच ठेवला आहे.

IMG 20250531 162435 inspection by seniors : शहापूर कोटेकलुर डाबरीकरणाचे काम निकृष्ट; वरिष्ठानी पाहणी करण्याची मागणी

यात ठेकेदारे बांधकाम अभियंत्याला हाताशी धरून आपले ऊकळ पाढरे करून पळ काढण्याचा प्रयत्न चालू केला आहे. परिणामी चोवीस तासात बनलेला डाबरी रस्ता उकडून जावून गिटी उघड्यावर दिसते आहे. तेव्हा वरिष्ठांनी शहापूर कोटेकलुर रस्ताची पाहणी करून संबंधित गुतेदारावर दण्डात्मकी कार्यवाही करावी अशी मागणी जनतेतुन होत आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments