Monday, May 18

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

MLA Amarbhau Rajurkar ; सिडको येथील महाराणा प्रताप सिहंजी स्मारक सुशोभीकरण जिल्हा नियोजन निधीतून करण्यासाठी प्रयत्न करणार,माजी आमदार अमरभाऊ राजुरकर

MLA Amarbhau Rajurkar ; सिडको येथील महाराणा प्रताप सिहंजी स्मारक सुशोभीकरण जिल्हा नियोजन निधीतून करण्यासाठी प्रयत्न करणार,माजी आमदार अमरभाऊ राजुरकर

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड l सिडको येथील महाराणा प्रतापसिंहजी यांच्या स्मारकासाठी जिल्हा नियोजन निधीतून सुशोभीकरण करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन माजी आमदार तथा भाजपा महानगर अध्यक्ष अमरभाऊ राजुरकर यांनी जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी केले. विरशिरमोणी महाराणा प्रतापसिंहजी यांच्या 485 व्या जयंतीनिमित्त 29 में रोजी सिडको महाराणा प्रताप सिंह चौक सिडको येथे सकाळी 11 वाजता भव्य भगवा ध्वजारोहण, प्रतिमा पुजा, अन्नदान वाटप भाजपा महानगर अध्यक्ष माजी आमदार अमरभाऊ राजुरकर, यांच्या सह प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक प्रतिनिधी संजय पाटील घोगरे,माजी नगरसेवक प्रतिनिधी उदय देशमुख, भाजपा प्रदेश सदस्य चैतन्य बापू देशमुख,माजी महापौर प्रतिनिधी विजय यवनकर, माजी सभापती किशोर स्वामी, भालचंद्र पवळे,माजी नगरसेवक उमेश चव्हाण,अमित तेहरा,बाळु खोमणे,अनिल हजारी,विजय गंभीरे,ॲड.दिलीप ठाकूर. रेणुका माता मंदिर समितीचे अध...
CIDCO ; सिडको येथील महाराणा प्रतापसिंह महाराज स्मारक साठी पाच लाखांचा निधी,आ.बोढारकर

CIDCO ; सिडको येथील महाराणा प्रतापसिंह महाराज स्मारक साठी पाच लाखांचा निधी,आ.बोढारकर

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड l सिडको येथील महाराणा प्रतापसिंह महाराज स्मारक सुशोभीकरण साठी पाच लाखांचा निधीची घोषणा नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार आनंदराव पाटील बोढारकर यांनी केली. महाराणा प्रतापसिंहजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सिडको येथील स्मारक ठिकाणी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार आनंदराव पाटील बोढारकर दक्षिण जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे, तालुका प्रमुख उध्दव पाटील शिंदे, सिडको शहर प्रमुख सुहास पाटील खराणे, ऊमरकेर ,रवि थोरात , पप्पू गायकवाड,कछवे,यांनी सिडको येथील महाराणा प्रतापसिंहजी यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी आ.बोढारकर यांनी पाच लाख रुपये सुशोभीकरण साठी घोषणा केली,या घोषणांचे स्वागत राजपूत समाज बांधवांनी टाळ्यांच्या गजरात केले.यावेळी आ.बोढारकर व उपस्थित मान्यवरांच्ये स्वागत संयोजक गजानन चंदेल यांनी केले....
Cm Devendra Fadanvis ; ‘खजिन्याची शोधयात्रा’ पुस्तकाच्या माध्यमातून देशाचे प्राचीन वैभव, इतिहास, संस्कृतीची मांडणी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Cm Devendra Fadanvis ; ‘खजिन्याची शोधयात्रा’ पुस्तकाच्या माध्यमातून देशाचे प्राचीन वैभव, इतिहास, संस्कृतीची मांडणी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, राजकीय
पुणे। 'खजिन्याची शोधयात्रा' या पुस्तकाच्या लेखनासाठी प्रशांत पोळ यांनी व्यापक संशोधन आणि अभ्यास केला आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून देशाचे प्राचीन वैभव, इतिहास, संस्कृती मांडण्यात आली असल्याने शासनाच्या माध्यमातून हे पुस्तक अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. पुस्तकाच्या माध्यमातून ज्ञानाचा मोठा खजिना जनतेपर्यंत जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. प्रशांत पोळ लिखित 'खजिन्याची शोधयात्रा' या पुस्तकाच्या बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मध्य प्रदेशचे सार्वजनिक बांधकाम मंत्री राकेश सिंह, मंदिर स्थापत्य व मूर्तीशास्त्राचे अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर, स्नेहल प्रकाशनचे रवींद्र घाटपांडे, राष्ट्रीय पुस्तक न्यासचे संचालक व पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पा...
Chhatrapati Sambhaji Nagar – Parbhani railway line cleared : छत्रपती संभाजी नगर – परभणी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी जमीन अधिग्रहणाचा प्रश्न मार्गी

Chhatrapati Sambhaji Nagar – Parbhani railway line cleared : छत्रपती संभाजी नगर – परभणी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी जमीन अधिग्रहणाचा प्रश्न मार्गी

नांदेड, छत्रपती संभाजीनगर, राजकीय
नांदेड| दक्षिण मध्ये रेल्वे विभागांतर्गत येणाऱ्या मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर ते परभणी या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचा मार्ग आता मार्गी लागणार आहे . यासाठी जमीन अधिग्रहणाचे अध्यादेश केंद्र सरकारकडून काढण्यात आलेले आहेत . खा. डॉ. अजित गोपछडे यांच्यासह नांदेड व मराठवाड्यातील अनेक लोकप्रतिनिधी आणि विविध संघटनांच्या वतीने अनेक वेळा निवेदने देऊन आंदोलन करण्यात आले होते .अखेर या पाठपुराव्याला यश आले आहे. दक्षिण मध्य रेल्वे विभागातील जवळजवळ सर्वच मार्गांच्या रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झालेला आहे . अनेक भागातील रुंदीकरणाचे कामही पूर्ण झालेले आहे. सिकंदराबाद ,विजयवाडा , गुंतकल , हैदराबाद , गुंटूर आणि नांदेड अशी एकूण सहा विभाग असलेल्या दक्षिण मध्य रेल्वे विभागातील नांदेड, पूर्णा ,परभणी ,जालना आणि छत्रपती संभाजी नगर या प्रमुख पाच रेल्वे स्थानकाचा समावेश नांदेड विभागात आहे . नांदेड ते छत...
Due to continuous rains, the bridge : सतंतधार पावसामुळे नरंगल ते कुरूडगीला जोडणारा पूल तुटला; गावकऱ्यांचा संपर्क तुटला…!

Due to continuous rains, the bridge : सतंतधार पावसामुळे नरंगल ते कुरूडगीला जोडणारा पूल तुटला; गावकऱ्यांचा संपर्क तुटला…!

राजकीय, नांदेड
देगलूर, गंगाधर मठवाले| देगलूर तालुक्यातील नरंगल कुरूडगी परिसरात गेल्या आठ-दहा दिवसापासून संततधार पावसामुळे नदी नाल्यांना पाणी आले आहे. त्यातच नरंगल ते कुरूडगी रस्त्यावरील पुल पडल्यामुळे कुरूडगी गावकऱ्यांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. गेल्या काही वर्षांपूर्वीच या फुलाचे बांधकाम झाले होते त्यामुळे संबंधित कंत्राटदारावर कार्यवाही करण्याची मागणी या निमित्ताने गावकऱ्यांनी केली आहे. सदरील रस्त्यावरील पुल पडल्यामुळे शाळकरी विद्यार्थी नागरिक मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडलेले आहेत. देगलूर तालुक्यातील शेवटच्या टोकाचे कुरूडगी गाव आहे. पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे संततदार पावसामुळे पुल कोसळला आहे. याकडे देगलूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. देगलूर बिलोली मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापुरकर यांनीही गावकऱ्यांच्या गैर...
Pandurang Shinde : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार नायगाव तालुकाध्यक्ष पदी पांडुरंग शिंदे यांची नियुक्ती

Pandurang Shinde : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार नायगाव तालुकाध्यक्ष पदी पांडुरंग शिंदे यांची नियुक्ती

नांदेड, राजकीय
नांदेड| राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार नांदेड जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर यांनी जिल्हा उपाध्यक्ष *पांडुरंग शिंदे मांजरमकर यांना नायगाव तालुकाध्यक्ष* पदाची जबाबदारी दिली. पांडुरंग शिंदे हे गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी चळवळीमध्ये शेतकरी ,शेतमजूर, व ग्रामीण भागातील अनेक प्रश्न घेऊन सातत्याने आंदोलने करत आहेत. नायगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील समस्यांची जाण असणाऱ्या आणि आक्रमक व अभ्यासू नेतृत्व म्हणून पक्षाने त्यांच्यावर तालुकाध्यक्ष पदाची महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्यच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ही निवड महत्त्वाचे मानली जाते. यावेळी जिल्हा सरचिटणीस डी.बी जांभरुणकर , महिला जिल्हाध्यक्ष प्रांजली रावणगावकर, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष रावणगावकर,धर्माबाद तालुकाध्यक्ष दिलीप कदम, धर्माबाद शहराध्यक्ष जावेद जबोरोदिन,रवींद्र शेट्टी, बी.ए.गोणारकर, धर्...
Cm Devendra Fadanvis ; हिंगोली जिल्ह्याच्या विकासाच्या आकांक्षा पूर्ण करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

Cm Devendra Fadanvis ; हिंगोली जिल्ह्याच्या विकासाच्या आकांक्षा पूर्ण करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

हिंगोली, राजकीय
हिंगोली। सामर्थ्यशील भारतासोबत सामर्थ्यशील महाराष्ट्र घडवताना हिंगोली जिल्ह्याच्या विकासाच्या सर्व आशा-आकांक्षा निश्चितपणे पूर्ण करू असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते हिंगोलीतील विविध विकासकामांच्या उद्घाटन तसेच भूमिपूजन प्रसंगी बोलत होते. हिंगोली येथील वैद्यकीय महाविद्यालयास हिंगोलीचे सुपुत्र भारतरत्न नानाजी देशमुख यांचे नाव देताना हिंगोली जिल्ह्याचा सिंचन अनुशेष दूर करणार असल्याची ग्वाही  त्यांनी यावेळी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिंगोलीतील 271 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार हेमंत पाटील, आमदार तानाजी मुटकुळे, संजय केनेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. हिंगोली जिल्ह्यातील नरसी न...
Marathwada issues! : खा. अशोकराव चव्हाण व भाजपच्या खासदार-आमदारांनी मराठवाड्याच्या प्रश्नांकडे वेधले शाह, फडणविसांचे लक्ष!

Marathwada issues! : खा. अशोकराव चव्हाण व भाजपच्या खासदार-आमदारांनी मराठवाड्याच्या प्रश्नांकडे वेधले शाह, फडणविसांचे लक्ष!

नांदेड, राजकीय
नांदेड| नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्याच्या अनेक प्रश्नांकडे खा. अशोकराव चव्हाण व भाजपच्या लोकप्रतिनिधींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले आहे. भाजपच्या शंखनाद सभेचे औचित्य साधून उभय नेत्यांच्या नांदेड भेटीदरम्यान त्यांना यासंदर्भातील निवेदने देण्यात आली सोमवारी सायंकाळी शासकीय विश्रामगृहात काही शिष्टमंडळांनी अमित शाह व देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी खा. अशोकराव चव्हाण यांच्यासह खा.डॉ. अजित गोपछडे, आ. भीमराव केराम, आ. तुषार राठोड, आ. राजेश पवार, आ. जितेश अंतापूरकर, आ. श्रीजया चव्हाण यांनीही दोन्ही वरिष्ठ नेत्यांशी अनेक सार्वजनिक मुद्यांवर चर्चा केली. खा. अशोकराव चव्हाण यांनी रेल्वे, रस्ते, आरोग्य व रोजगार निर्मितीबाबत निवेदने दिली. यामध्ये रेल्वेबाबतच्या निवेदनात नांदेड परिसरात नवीन रेल्वे कोच निर्मिती प्रकल्प उभारणे, नांदेड-बिदर रेल्...
Help farmers : अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्या

Help farmers : अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्या

नांदेड, राजकीय
नांदेड| गेल्या पंधरा दिवसात नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे पिकांचे आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त पिकांचे आणि फळबागांचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करा अशी मागणी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आ. आनंदराव पाटील बोंढारकर यांनी राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे केली आहे. आज मुंबईत आ. बोंढारकर यांनी ना. कोकाटे यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले. नांदेड जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसापासून जोरदार पाऊस होत आहे. नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातही या पावसाचा मोठा फटका बसला आहे . बेमोसमी पावसामुळे उन्हाळी पिकांना प्रचंड फटका बसला तर फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे शिवाय पशुधनही या दगावले आहे. त्यामुळे शेतकरी पेरणीपूर्वीच हवालदिल झाला आहे. सततच्या अवकाळी पावसामुळे आणि वादळी वा...
Immediately provide subsidy  : अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतक-यांना एकरी २० हजार व हेक्टरी ५० हजारांचे अनुदान तातडीने द्या – हर्षवर्धन सपकाळ

Immediately provide subsidy : अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतक-यांना एकरी २० हजार व हेक्टरी ५० हजारांचे अनुदान तातडीने द्या – हर्षवर्धन सपकाळ

मुंबई, राजकीय
मुंबई| राज्यातील शेतकरी संकटाचा सामना करत असतानाच मुसळधार पावसाने पुन्हा त्याला संकटात टाकले आहे. या पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेले पिकही वाहून गेले आहे. निसर्ग लहरी झाला असून राज्यातील फडणविसांचे सुलतानी सरकार शेतकरी व जनतेच्या मुळावर उठले आहे. संकटातील शेतकऱ्याला मदतीची गरज असून सरकारने पंचनाम्याचे सरकारी सोपस्कर बाजूला ठेवून नुकसानग्रस्तांना एकरी २० हजार रुपये मदत तातडीने द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे. गांधी भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, बळीराजा संकटात आल्यास त्याला तातडीने मदत करण्याचे काम काँग्रेसचे सरकार असताना अनेकदा केले आहे. पिकावर रोग पडला, लाल्या पडल्या, गारपीट झाली, अवकाळी पावसाने नुकसान झाले की सरकारने कशाचीही पर्वा न करता शेतकऱ्याला मदत दिली ...
error: Content is protected !!