HomeनांदेडMLA Amarbhau Rajurkar ; सिडको येथील महाराणा प्रताप सिहंजी स्मारक सुशोभीकरण जिल्हा...

MLA Amarbhau Rajurkar ; सिडको येथील महाराणा प्रताप सिहंजी स्मारक सुशोभीकरण जिल्हा नियोजन निधीतून करण्यासाठी प्रयत्न करणार,माजी आमदार अमरभाऊ राजुरकर

नवीन नांदेड l सिडको येथील महाराणा प्रतापसिंहजी यांच्या स्मारकासाठी जिल्हा नियोजन निधीतून सुशोभीकरण करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन माजी आमदार तथा भाजपा महानगर अध्यक्ष अमरभाऊ राजुरकर यांनी जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी केले.

विरशिरमोणी महाराणा प्रतापसिंहजी यांच्या 485 व्या जयंतीनिमित्त 29 में रोजी सिडको महाराणा प्रताप सिंह चौक सिडको येथे सकाळी 11 वाजता भव्य भगवा ध्वजारोहण, प्रतिमा पुजा, अन्नदान वाटप भाजपा महानगर अध्यक्ष माजी आमदार अमरभाऊ राजुरकर, यांच्या सह प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक प्रतिनिधी संजय पाटील घोगरे,माजी नगरसेवक प्रतिनिधी उदय देशमुख, भाजपा प्रदेश सदस्य चैतन्य बापू देशमुख,माजी महापौर प्रतिनिधी विजय यवनकर, माजी सभापती किशोर स्वामी, भालचंद्र पवळे,माजी नगरसेवक उमेश चव्हाण,अमित तेहरा,बाळु खोमणे,अनिल हजारी,विजय गंभीरे,ॲड.दिलीप ठाकूर.

रेणुका माता मंदिर समितीचे अध्यक्ष राजुसिंह अग्नीवंशी,रामभक्त आशिष भैय्या चौधरी,सतिश बसवदे,राजु लांडगे,नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रमेश ठाकूर, नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तिरूपती पाटील घोगरे, पत्रकार दिंगाबर शिंदे,माधव शिरसाठ पत्रकार सारंग नेरलकर,यांच्या सह मान्यवर पदाधिकारी यांच्या उपस्थिती होती, प्रारंभी महाराणा प्रतापसिंहजी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले, यावेळी उपस्थित समाजबांधवांनी महाराणा प्रताप सिंह यांच्या जयघोष केला.

माजी आमदार अमरभाऊ राजुरकर यांनी जयंतीनिमित्त अन्नदान वाटप स्तुत्य उपक्रम राबविल्याचे सांगुन स्मारक सुशोभीकरण करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

प्रास्ताविक गजानन चंदेल यांनी केले तर उपस्थित मान्यवरांच्ये स्वागत केले. यावेळी जेष्ठ समाज बांधव प्रकाशसिंह परदेशी, राजेंद्र चंदेल, सचिनसिहं चव्हाण ,राहुलसिहं चव्हाण, निरजसिंह चव्हाण , अमर बायस ,गजाननसिहं चंदेल,गोविंद ठाकूर,सुषमा ठाकूर, सरिता बैस, ओम ठाकूर, राहुल चंदेल,ग्यानी ठाकूर, नरसिंह ठाकूर,पवन ठाकूर,सतिश विदेह,रवी ठाकूर, कन्हैया ठाकुर, रोहन ठाकुर यांच्या सह सकल राजपूत समाज सिडको हडको यांच्यी उपस्थिती होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments