Monday, May 18

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Congress’s Jai Jawan, Jai Kisan Jai Hind Tricolour rally : नांदेडमध्ये काँग्रेसच्या जय जवान, जय किसान, जय हिंद तिरंगा रॅलीला प्रचंड प्रतिसाद

Congress’s Jai Jawan, Jai Kisan Jai Hind Tricolour rally : नांदेडमध्ये काँग्रेसच्या जय जवान, जय किसान, जय हिंद तिरंगा रॅलीला प्रचंड प्रतिसाद

नांदेड, राजकीय
नांदेड| पहलगाममध्ये ३०० किमी आत येऊन अतिरेक्यांनी निरपराध २६ नागरिकांची हत्या केली व परत गेले आणि आजपर्यंत ते सापडले नाहीत हे सरकारचे अपयश आहे. हे दहशतवादी तीनशे किलोमीटर आत आले कसे व परत गेले कसे? याचे उत्तर अमित शाह यांनी दिले नाही. पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याची संधी असतानाही ती सोडली व अचानक युद्धविराम का केला? डोनाल्ड ट्रम्पच्या धमक्यांना घाबरून युद्धविराम केला का? याची उत्तरे भाजपा सरकारला द्यावी लागतील असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. नांदेडमध्ये आज काँग्रेस पक्षाच्या वतीने जय जवान जय किसान जय हिंद रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, खा. प्रा. रविंद्र चव्हाण, खा. डॉ. शिवाजी काळगे, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष हनुमंत पाटील बेटमोगरेकर, शहर काँग्रेस अध्यक्ष अब्दुल सत्तार, माधवराव पाटील जवळगावकर, सुरेश गायकवाड, ह...
Hariharrao Bhosikar passes away : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हरिहरराव भोसीकर यांचे निधन ; लोहा कंधार तालुक्याची राजकीय हानी

Hariharrao Bhosikar passes away : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हरिहरराव भोसीकर यांचे निधन ; लोहा कंधार तालुक्याची राजकीय हानी

नांदेड, राजकीय
नांदेड| नांदेड जिल्हयाच्या राजकारणात साडे तीन-चार दशके सक्रीय असलेले राज्य गृह व वित महामंडळाचे माजी अध्यक्ष व संचालक जिल्हा बँकेचे विद्यमान उपाध्य‌क्ष, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, या व अशा विविध पदावर राहिलेले प्रचंड लोकसंग्रह असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष हरिहरराव विश्वनाथअप्पा भोसीकर यांची दीर्घ आजाराने वयाच्या ७० व्या वर्षी मंगळवारी (२७ मे) रोजी निधन झाले. पानभोसी ( ता कंधार) येथे बुधवार सकाळी ११ वाजता त्यांच्यावर अत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. नव्वदीच्या काळात जिल्ह्याच्या राजकारणात कुंटुरकर गोरठेकर, भोसीकर, चिखलीकर यांचा जिल्हा परिषदेच्या राजकारण व प्रशासनात दबदबा होता. हरिहरराव भोसीकर यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात १९८० मध्ये कंधार तालुका खरेदी-विक्री संघाच्या संचालक पदापासून झाली. हरिहरराव भोसीकर यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, कृषी व पशुसंवर्धन सभाप...
Amit Shah : बाळासाहेब ठाकरे असते तर सिंदूर ऑपरेशनसाठी त्यांनी मोदींचे गळाभेट घेऊन अभिनंदन केले असते – अमित शहा

Amit Shah : बाळासाहेब ठाकरे असते तर सिंदूर ऑपरेशनसाठी त्यांनी मोदींचे गळाभेट घेऊन अभिनंदन केले असते – अमित शहा

नांदेड, राजकीय
नांदेड|  देवेंद्र भाऊ मराठवाड्यातून दुष्काळ नष्ट करून नंबर १ महाराष्ट्र करतील असे उद्गार नांदेडच्या सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहां यांनी काढले. भारतीय सेनेने पहेलगाम हल्ल्यातील शहिदांच्या बदल घेत ऑपरेशन सिंदूर राबून दहशतवाद्यांना शोधून मारले. नांदेड गुरु गोविंद सिंग यांची भूमी आहे, इथून पाकिस्तानपर्यंत आवाज पोहोचेल असा प्रचंड आवाज आला पाहिजे असे म्हणत ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या. आज जर बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी सिंदूर ऑपरेशनसाठी त्यांनी मोदींचे गळाभेट घेऊन अभिनंदन केले असते. उद्धव ठाकरे विरोधकांची भाषा बोलत असून, धोका देऊन त्यांनी आघाडी सरकार बनविले होते असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. नांदेड येथे आयोजित विशाल जाहीर सभेत उपस्थितांशी संवाद साधत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले, देवेंद्र फडणवीस एकमेव असे आहेत जे पाच वर्ष काम करून पुन्हा निवडून आले आहे...
‘Antyodaya’ public relations office : खा. डॉ. अजित गोपछडे यांच्या भाजपा ‘अंत्योदय’ जनसंपर्क कार्यालयाचे अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन

‘Antyodaya’ public relations office : खा. डॉ. अजित गोपछडे यांच्या भाजपा ‘अंत्योदय’ जनसंपर्क कार्यालयाचे अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन

नांदेड, राजकीय
नांदेड| भारतीय जनता पार्टीचे राज्यसभा सदस्य खासदार डॉ. अजित गोपछडे यांचे भाग्यनगर ते आनंदनगर रोडवर अत्याधुनिक सुविधांनी उभारण्यात आलेल्या अंत्योदय जनसंपर्क कार्यालयाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज थाटात उद्घाटन करण्यात आले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्य अध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण , माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण , राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे , माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे , पालकमंत्री अतुल सावे , आ. तुषार राठोड, आ. श्रीजया चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. चार मजली अंत्योदय कार्यालयात जनकल्याणासाठी अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तळ मजल्यावर राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देणारे कक्ष , शिवाय याच ठिकाणी त्य...
‘Shankhnaad’ : ‘शंखनाद’ सभेची तयारी पूर्ण; भाजपात कमालीचा उत्साह

‘Shankhnaad’ : ‘शंखनाद’ सभेची तयारी पूर्ण; भाजपात कमालीचा उत्साह

नांदेड, राजकीय
नांदेड| केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या 'शंखनाद' सभेसाठी भारतीय जनता पक्षाची तयारी पूर्ण झाली असून, जिल्ह्यात सर्वत्र प्रचंड उत्साहाचे वातावरण दिसून येते आहे. जिल्ह्यातील सर्वच नेते सभेसाठी जोरदार तयारीला लागले आहेत, तर ही सभा भव्य करण्याचा चंग कार्यकर्त्यांनी बांधला आहे. केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे कार्याध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण आदी प्रमुख नेतेमंडळी सुद्धा नांदेड शहरात येणार असल्याने या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे रविवारी नांदेड शहरात डेरेदाखल झाले असून, दुपारी त्यांनी खा. अशोकराव चव्हाण यांच्यासमवेत सभास्थळासह दौऱ्यातील इतर कार्यक्रम स्थळांची पाहणी केली. याप्रसंगी खा.डॉ. अजित गोपछडे, संघटन मंत्री संजय कौडगे,नांदेड महानग...
MLA Pratap Patil Chikhlikar : जल जीवन मिशनची कामे दर्जेदार करून घेण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्या – आमदार प्रताप पाटील चिखलीकर

MLA Pratap Patil Chikhlikar : जल जीवन मिशनची कामे दर्जेदार करून घेण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्या – आमदार प्रताप पाटील चिखलीकर

नांदेड, राजकीय
उस्माननगर, माणिक भिसे| जल जीवन मिशनची कामे दर्जेदार करून घेण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन आमदार प्रताप पाटील चिखलीकर यानी केले. एक दिवस गावकऱ्यांसोबत या उपक्रमा अंतर्गत ग्राम दरबार या कार्यक्रमाचे आयोजन दि.२५ रोजी मारतळा ता. लोहा येथे करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की जल जीवन मिशन योजनेचे काम एकदा झाल्यावर किमान वीस पंचवीस वर्ष तरी पाणी पुरवठ्याचे काम त्या गावात होणार नाही. त्यामुळे आताच त्या कामावर ग्रामस्थांनी लक्ष देऊन ती काम दर्जेदार पद्धतीचे करून घ्यावे. कोणत्याही गावात निकृष्ट काम होत असल्यास विरोधक असो की सत्ताधारी यांनी माझ्याकडे ताडतोब तक्रार द्या संबंधित अधिकारी आणि गुतेदारावर कारवाई केली जाईल. या कामात हलगर्जी करणाऱ्याची गय केली जाणार नाही असे म्हणाले. यावेळी व्यासपीठावर तहसिलदार विठ्ठल परळीकर, बीडीओ डी के आडेराघो, माजी आमद...
Mahur News : माहूर बस स्थानकाच्या जागेत शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्याचा मार्ग मोकळा

Mahur News : माहूर बस स्थानकाच्या जागेत शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्याचा मार्ग मोकळा

नांदेड, राजकीय
श्रीक्षेत्र माहूर l माहूर तालुक्यातील बेरोजगारीची समस्या पाहता आमदार भीमराव रामजी केराम यांनी एसटी महामंडळाला माहूर बस स्थानकाच्या जागेत शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्यासाठी पत्रव्यवहार केला होता या पत्र व्यवहाराला सकारात्मक प्रतिसाद देत एसटी महामंडळाचे वास्तू शास्त्रज्ञ रा प महामंडळ म का मुंबई यांनी विभाग नियंत्रक रा प नांदेड यांना पत्र पाठवून तात्काळ बस स्थानकाच्या समोरील जागेत शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारणी बाबत वास्तुस्थितीजन्य माहिती सादर करण्याचे आदेश दिल्याने माहूर बस स्थानका च्या जागेत शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्याचा मार्ग मोकळा झाल्याने माहूर तालुक्यातील जनतेतून आमदार भीमराव केराम यांचे वर अभिनंदन वर्षाव होत आहे. शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारल्यास शेकडो नागरिकांना रोजगारासाठी गाळे होणार उपलब्ध, दैनिक एकमतनेही केला होता पाठपुरावा माहूर तालुक्यात उद्योगधंदे नसल्याने तालुक्यातील युवा वर्ग परराज्यात...
Shivsena Tiranga Rally ; भारतीय सैनिकांच्या समर्थनात शिवसेनेच्या तिरंगा रॅलीला उदंड प्रतिसाद

Shivsena Tiranga Rally ; भारतीय सैनिकांच्या समर्थनात शिवसेनेच्या तिरंगा रॅलीला उदंड प्रतिसाद

नांदेड, राजकीय
नांदेड। पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय जवानांनी पाकिस्तान मध्ये घुसून केलेल्या कारवाईच्या समर्थनार्थ आणि भारतीय जवानांना सलाम करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने आज नांदेडमध्ये तिरंगा मोटरसायकल रॅली काढण्यात आली. भीज पावसात काढण्यात आलेल्या तिरंगा मोटरसायकल राहिलेला प्रचंड प्रतिसाद मिळाला . भारत माता की जय च्या घोषणानी अवघे नांदेड शहर दणाणले. शिवसेना उपनेते तथा मंत्री विधानपरिषद गटनेते आमदार ना. हेमंतभाऊ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आ. आनंदराव पाटील बोंढारकर व आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी जुना मोंढा येथून प्रचंड उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात तिरंगा रॅलीला सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित संपर्कप्रमुख दत्तात्रय पईतवार,शिवसेना जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, जिल्हाप्रमुख गंगाधर बडुरे, जिल्हाप्रमुख विनय पाटील गिरडे, सुहास बालाजी कल्याणकर, जिल्हासंघटक शं...
Gram Panchayat : ग्रामपंचायतीचा ग्रामसभा ऐवजी संविधान सभा नाव परिवर्तन करा, सामाजिक कार्यकर्ते भि.ना.गायकवाड यांच्यी मागणी

Gram Panchayat : ग्रामपंचायतीचा ग्रामसभा ऐवजी संविधान सभा नाव परिवर्तन करा, सामाजिक कार्यकर्ते भि.ना.गायकवाड यांच्यी मागणी

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड l भारतीय राज्य घटना अनुच्छेद 243 (ख) (घ) (छ) आणि 243 (क) अनुसार. ग्राम स्तरापासुन लोकशाही बळकट करण्यासाठी ग्राम पंचायतीचे " ग्राम संविधान सभा " असे नावपरिवर्तन करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा संस्थापक अध्यक्ष संविधान हक्क परिषद महाराष्ट्र राज्य, भि.ना. गायकवाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. दिलेल्या निवेदनात भारतीय राज्य घटनेच्या अनुच्छेद 243 (ख) (घ) (छ) आणि 243 (क) मधील तरतुदीनुसार या प्रयोनासाठी ग्राम पातळीवरील एखाद्या भागास मा. राज्यपाल महोदयांनी " ग्राम" आहे असे अधिसुचनेव्दारे विनिर्दिष्ट केले असेल तर त्या भागास "ग्राम" असे समजण्यात यावे आणि त्या " ग्राम" पातळीवरील पंचायत क्षेत्रासाठी " ग्राम सभा" घटीत करण्यात यावी. या प्रयोजनासाठी घटीत करण्यात आलेली " पंचायत " स्थानिक स्वराज्य संस्था असेल असे नमुद करण्यात आले आह...
Amit Shah ; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा २६ मे रोजी नांदेडला

Amit Shah ; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा २६ मे रोजी नांदेडला

नांदेड, राजकीय
नांदेड। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा २६ मे रोजी नांदेड शहराच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता असून, माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांनी या माहितीचे सुतोवाच केले आहे. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून भाजप नांदेड महानगरच्या वतीने आयोजित कार्यशाळेत बोलताना खा. चव्हाण यांनी या संभाव्य दौर्‍याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, भाजपचे वरिष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सोमवारी २६ मे रोजी नांदेडच्या भेटीवर येणार आहेत. या भेटीचा अधिकृत कार्यक्रम अद्याप जारी झालेला नाही. मात्र, दौऱ्यामध्ये अमित शहा यांचे सार्वजनिक कार्यक्रम असतील, असेही खा. चव्हाण यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीनंतर ते प्रथमच नांदेडला येणार असून, या दौऱ्याच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाने पूर्वतयारीला सुरुवात केल्याचे दिसून येते आहे....
error: Content is protected !!