श्रीक्षेत्र माहूर l माहूर तालुक्यातील बेरोजगारीची समस्या पाहता आमदार भीमराव रामजी केराम यांनी एसटी महामंडळाला माहूर बस स्थानकाच्या जागेत शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्यासाठी पत्रव्यवहार केला होता या पत्र व्यवहाराला सकारात्मक प्रतिसाद देत एसटी महामंडळाचे वास्तू शास्त्रज्ञ रा प महामंडळ म का मुंबई यांनी विभाग नियंत्रक रा प नांदेड यांना पत्र पाठवून तात्काळ बस स्थानकाच्या समोरील जागेत शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारणी बाबत वास्तुस्थितीजन्य माहिती सादर करण्याचे आदेश दिल्याने माहूर बस स्थानका च्या जागेत शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्याचा मार्ग मोकळा झाल्याने माहूर तालुक्यातील जनतेतून आमदार भीमराव केराम यांचे वर अभिनंदन वर्षाव होत आहे. शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारल्यास शेकडो नागरिकांना रोजगारासाठी गाळे होणार उपलब्ध, दैनिक एकमतनेही केला होता पाठपुरावा


माहूर तालुक्यात उद्योगधंदे नसल्याने तालुक्यातील युवा वर्ग परराज्यात जाऊन रोजगार मिळवत आहेत तालुक्यातील बेरोजगार तालुक्यातच रोजगार उपलब्ध हवा या उदात्त हेतूने माहूरच्या बस स्थानकाच्या जागेत शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारावे म्हणून पत्रकार इलियास बावाणी यांनी आमदार भीमराव केराम यांचे सह सर्व मान्यवराकडे पत्रव्यवहार केला होता याची दखल घेऊन आमदार भीमराव केराम यांनी राप महामंडळाकडे शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्याची मागणी पत्राद्वारे केली होती याची दखल घेऊन एसटी महामंडळ विभागाचे वास्तु शास्त्रज्ञ यांनी नांदेडच्या विभाग नियंत्रक च ना वडचकर यांना शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारणी बाबत तात्काळ विहित नमुन्यात माहिती सादर करण्याचे आदेशित केल्याने शॉपिंग कॉम्प्रेस उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे

आमदार भीमराव केराम हे बेरोजगारी शेती समस्या आणि इतर कुठल्याही समस्या बाबत नागरिकांनी मागणी केल्यास तत्काळच दखल घेतात याची प्रचिती मतदारांना आल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत या कामी भाजपाचे रुग्ण कल्याण समिती सदस्य अनिल वाघमारे यांनीही बराच पाठपुरावा केला असून विभाग नियंत्रक च ना वडचकर आगारप्रमुख विश्वनाथ चिबडे बस स्थानक प्रमुख वसंत जावळे यांनी तात्काळ माहिती सादर करून शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारणीचा भूमिपूजन सोहळा लवकर पार पडेल अशी सदिच्छा अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे
