Mahur News : माहूर बस स्थानकाच्या जागेत शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्याचा मार्ग मोकळा
श्रीक्षेत्र माहूर l माहूर तालुक्यातील बेरोजगारीची समस्या पाहता आमदार भीमराव रामजी केराम यांनी एसटी महामंडळाला माहूर बस स्थानकाच्या जागेत शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्यासाठी पत्रव्यवहार केला होता या पत्र व्यवहाराला सकारात्मक प्रतिसाद देत एसटी महामंडळाचे वास्तू शास्त्रज्ञ रा प महामंडळ म का मुंबई यांनी विभाग नियंत्रक रा प नांदेड यांना पत्र पाठवून तात्काळ बस स्थानकाच्या समोरील जागेत शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारणी बाबत वास्तुस्थितीजन्य माहिती सादर करण्याचे आदेश दिल्याने माहूर बस स्थानका च्या जागेत शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्याचा मार्ग मोकळा झाल्याने माहूर तालुक्यातील जनतेतून आमदार भीमराव केराम यांचे वर अभिनंदन वर्षाव होत आहे. शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारल्यास शेकडो नागरिकांना रोजगारासाठी गाळे होणार उपलब्ध, दैनिक एकमतनेही केला होता पाठपुरावा
माहूर तालुक्यात उद्योगधंदे नसल्याने तालुक्यातील युवा वर्ग परराज्यात...
