Monday, May 18

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Mp Ravindra Chavhan ; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळेल: खासदार रवींद्र चव्हाण

Mp Ravindra Chavhan ; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळेल: खासदार रवींद्र चव्हाण

नांदेड, राजकीय
नांदेड। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपरिषदा आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. या संदर्भात नांदेडचे खासदार रविंदर चव्हाण यांनी म्हटले की, येत्या काळात सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने सहभागी होईल. जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला बहुमत मिळेल. ते म्हणाले की, नांदेडमध्ये काँग्रेस पक्ष कधीही कमकुवत नव्हता आणि भविष्यातही कधीही कमकुवत राहणार नाही. नांदेड जिल्हा हा काँग्रेसचा मजबूत बालेकिल्ला आहे. नांदेड महानगरपालिका व इतर सर्व निवडणुका   काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने लढवेल. नांदेड महापालिकेत काँग्रेसला बहुमत मिळेल. जे विरोधक नांदेड जिल्ह्यात काँग्रेसला कमकुवत दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना निवडणुकीत नांदेडची जनता त्यांची जागा दाखवून देईल....
Mla Baburao Kadam Kohalikar ; आ.बाबुराव कदम कोहळीकर यांच्या जनता दरबारच्या प्रतिक्षेत सर्व सामन्य नागरिक

Mla Baburao Kadam Kohalikar ; आ.बाबुराव कदम कोहळीकर यांच्या जनता दरबारच्या प्रतिक्षेत सर्व सामन्य नागरिक

नांदेड, राजकीय
हदगांव, शेख चांदपाशा। हदगांव विधानसभा क्षेत्राचे आ. बाबूरावजी कदम कोहळीकर यांनी निवडून येताच जाने -2025 ला हदगाव तहसील कार्यालयाच्या परिसरात प्रशासकीय आढावा बैठकीनंतर जनता दरबार लावला होता. त्यावेळी हदगाव तालुक्यातील जनतेचे काही प्रमाणात प्रश्न तेथेच निकाली काढण्यात आले होते. जनता दरबारच्या समारोपाच्या वेळी दर तीन महिन्यांनी जनतेच्या तक्रारी ऐकण्यात येतील असं  ठणकावून विद्यमान आमदार यांनी सांगितले. त्या अनुषंगाने नागरिक आज जनता दरबारच्या प्रतीक्षेत आहे. हदगाव शहरात व तालूक्यात सध्या लग्नसराई  मौसम व इतर कार्यक्रमाच रेलचेल आहे. बहुसंख्य राजकीय नेते मंडळीची हजेरी लावण्यासाठी धावपळ होत असल्याने हदगाव शहरातील व तालुक्यातील प्रशासनावर त्यांचं वचक असल्याचे दिसुन येत नाही. कारण महसुल, कृषी, वन विभागाच्या वतीने शासनाच्या कोणत्या योजना आहेत ते सांगण्यासाठी तालुक्यातील संबंधित  अधिकाऱ्यांना वेळ न...
Zp Election Confusion ; हिमायतनगर तालुक्यात जि.प.चे दोन गट की तिन, कार्यकर्ते संभ्रमात

Zp Election Confusion ; हिमायतनगर तालुक्यात जि.प.चे दोन गट की तिन, कार्यकर्ते संभ्रमात

नांदेड, राजकीय
हिमायतनगर। तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीचे गट दोन की,तिन या संभ्रमात कार्यकर्ते आहेत. आता सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकां घ्या असे आदेश राज्यशासनाला केले असल्याने जि.प. व पंचायत समितीच्या निवडणूकीच्या चर्चेने वेग धरला आहे. तसेचं नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक ही यासोबतच होणार असल्याने पुढारी आता आगामी निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. हिमायतनगर तालुक्यात पुर्वी जिल्हा परिषदेचे कामारी, सरसम, व हिमायतनगर असे तिन गट होते. हिमायतनगर नगर पंचायत अस्तित्वात आल्यानंतर या ठिकाणचा जिल्हा परीषेदेचा हिमायतनगर गट कमी झाला. आपसुकच पंचायत समितीचे दोन गण कमी झाले. सध्याला कामारी, दुधड, सरसम, सिरंजनी असे चार गण आहेत. तत्कालीन आघाडी शासनाने पुर्वी प्रमाणे जिल्हा परिषदेचे तिन गट पंचायत समितीचे सहा गण असा नियम लागू केला. परंतू सत्ता परिवर्तनाऩंतर महा युती स...
Tricolor Rally : वंचित बहुजन आघाडी च्या वतीने कंधार मध्ये तिरंगा रॅली

Tricolor Rally : वंचित बहुजन आघाडी च्या वतीने कंधार मध्ये तिरंगा रॅली

नांदेड, राजकीय
कंधार, उस्माननगर, माणिक भिसे l श्रीनगर मध्ये पैलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला आणि शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली आणि भारतीय सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष एड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार कंधार शहरातील मुख्य रस्त्याने तिरंगा रॅली काढण्यात आली. पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भाने वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष एड. बाळासाहेब आंबेडकर यांनी आपला वाढदिवस साजरा न करता पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध आणि भारत पाकिस्तान यांच्या मध्ये युद्धजन्य परिस्थिती तसेच शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली आणि भारतीय सैन्यांचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे महाराष्ट्रातील त्यांचे कार्यकर्ते, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि वंचित बहुजन आघाडी च्या वतीने यांनी त्यांचा...
Deputy Chief Minister Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नांदेडमध्ये आगमन

Deputy Chief Minister Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नांदेडमध्ये आगमन

नांदेड, राजकीय
नांदेड| राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी नांदेड विमानतळावर आगमन झाले. यावेळी उद्योग,सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार विक्रम काळे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार,मनपा आयुक्त महेशकुमार डोईफोडे आदींची उपस्थिती होती....
diagnosis and treatment camp : हिमायतनगर येथे आयोजित सर्वरोग निदान व उपचार शिबिरास रुग्णांचा उदंड प्रतिसाद

diagnosis and treatment camp : हिमायतनगर येथे आयोजित सर्वरोग निदान व उपचार शिबिरास रुग्णांचा उदंड प्रतिसाद

नांदेड, आरोग्य, राजकीय, व्हिडीओ
हिमायतनगर,अनिल मादसवार। येथील श्री परमेश्वर मंदिरात दिनांक 11 में नृसिंह जयंतीच्या शुभमुहूर्तावर हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार बाबुराव कदम कोहलीकर यांच्या पुढाकाराने दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी यांच्या वतीने मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते, या शिबिरात एकूण 1500 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी अंदाजे 500 रुग्णांना पुढील उपचारासाठी पाठविण्यात येणार आहे. मागील पाच वर्षांपासून आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या पुढाकाराने गोरगरीब रुग्णांना मोफत उपचार मिळावा या उद्देशाने हदगाव आणि हिमायतनगर येथे स्वतंत्र शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे, त्याचं पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन आमदार बाबूराव कदम यांच्या हस्ते फीत कापून व विलास वानखेडे यांच्या हस...
Dcm Ajit Pawar ; राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा

Dcm Ajit Pawar ; राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा

नांदेड, राजकीय
नांदेड। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे रविवार 11 मे 2025 रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. रविवार 11 मे 2025 रोजी मुंबई येथून विमानाने सकाळी 9.10 वा. श्री गुरू गोविंद सिंघजी विमानतळ नांदेड येथे आगमन व मोटारीने प्रयाण. सकाळी 9.45 वा. माजी आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या निवासस्थानी इंदिरा निवास काळेश्वर रोड विष्णुपूरी येथे आगमन व राखीव. मोटारीने सकाळी 11.15 वा. कै. मधुकरराव घाटे सहकारी सुतगिरणी मुखेड येथे आगमन व राखीव. मोटारीने दुपारी 12 वा. मुखेड तालुक्यातील चव्हाणवाडी (बाऱ्हाळी) येथे आगमन व कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थिती. दुपारी 1.30 ते 2.30 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 3.15 वा. देगलूर येथे शहीद जवान कै. सचिन यादवराव वनंजे यांच्या घरी सात्वंनपर भेट. नंतर व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्या निवासस्थानी देगलूर येथे राखीव. सायं मोटारीने नांदेड...
MP’s water shortage meeting : विद्यामान खासदाराच्या पाणी टंचाई बैठकीला अनेक कर्मचारी अधिका-यांची दांडी

MP’s water shortage meeting : विद्यामान खासदाराच्या पाणी टंचाई बैठकीला अनेक कर्मचारी अधिका-यांची दांडी

नांदेड, राजकीय
हदगांव, शेख चांदपाशा| हिंगोली लोकसभाचे खा.नागेश पाटील आष्टीकर यांनी सोमवारी बोलविलेल्या हदगाव - हिमायतनगर तालुक्यातील कर्मचार्याच्या अधिकाऱ्यांची आयोजित पाणी टंचाई आढावा बैठकीला अनेक संबधीत कर्मचारी व अधिकारी गैरहजर होते. याबाबत खा.नागेश पा.आष्टीकर हे स्थानिय प्रशासनावर चांगले संतापले. अश्या बैठकीला 'गौण ... 'समजणा-या गैरहजर कर्मचारी अधिकारी यांच्यावर त्वरित कारवाई संदर्भात... जिल्हाधिकारी नांदेडकडे बैठक लावून कारवाईची सूचना जिल्हाधिकाऱ्याकडे करण्यात येईल असं सांगितलं. अशा दांडी बहाद्दर कर्मचारी व अधिकाऱ्यावर प्रशासनद्वारे कोणती कारवाई करण्याचे निर्देश दिले. याबाबत स्थानिय प्रशासन काहीच माहिती देण्यात येत नाही. या बाबत मुजोर अधिकारी हतबल जनता झाल्याचा नागरिकांना प्रत्यय येत आहे. हदगाव तालुक्यात 125 ग्रामपंचायती असून वाडी तांड्यासह गावांची संख्या 178 असल्याची माहीती आहे. तालुक्यात किती ह...
cyber crimes and fraud : सायबर गुन्हे व फसवणूक टाळण्यासाठी अधिक परिणामकारपणे काम करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

cyber crimes and fraud : सायबर गुन्हे व फसवणूक टाळण्यासाठी अधिक परिणामकारपणे काम करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नांदेड, मुंबई, राजकीय
मुंबई| सायबर सुरक्षेसाठी देशातील अत्याधुनिक सुविधा महाराष्ट्रात आहेत. या माध्यमातून सायबर गुन्हे, सायबर फसवणूक व मानवी तस्करीपासून लोकांना वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.या पुढील काळातही अधिक परिणामकारपणे काम करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र सायबरच्या आर्टिफिशियल इंटिलिजन्स बॉट व सायबर जागरुकता माहितीपट या नाविन्यपूर्ण नागरिक केंद्रीत उपक्रमांचे अनावरण सह्याद्री अतिथिगृहात करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र सायबरचे अतिरिक्त पोलीस महासंचालक यशस्वी यादव, पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे, पोलीस अधीक्षक हेमराजसिंग राजपूत, अभिनेता शरद केळकर, अभिनेत्री अमिषा पटेल, मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी सायबर सुरक्षा विषयक माहितीपट दाखविण्यात ...
Dr. Ajit Gopchhade : जिल्हा प्रशासनाच्या सहकार्यातून विकास कार्य गतिमान करू : खा. डॉ. अजित गोपछडे

Dr. Ajit Gopchhade : जिल्हा प्रशासनाच्या सहकार्यातून विकास कार्य गतिमान करू : खा. डॉ. अजित गोपछडे

नांदेड, राजकीय
नांदेड| राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून सर्वसामान्यांचा विकास साधण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने आगामी काळात विकास कामे पूर्ण होतील असा विश्वास खासदार अजित गोपछडे यांनी व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच संपन्न झालेल्या नांदेड जिल्हा प्रशासन विकासकार्य आढावा बैठकीत खा. डॉ. गोपछडे बोलत होते. लोकांच्या अनेक प्रश्नांची माहिती घेऊन प्रशासनास अवगत केले. कडक उन्हाळ्यामुळे नांदेड शहरातील आणि जिल्ह्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची सूचना केली. ग्रामीण भागात सध्या खरीप हंगामाची पूर्व तयारी चालू झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून शेतकरी बांधवांना योग्य वेळी मदत व्हावी म्हणून जिल्ह्यातील मालगुजारी तलावातला गाळ तात्काळ काढावा यासाठी मनरेगा आणि लोकसहभागातून ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावेत....
error: Content is protected !!