कंधार, उस्माननगर, माणिक भिसे l श्रीनगर मध्ये पैलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला आणि शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली आणि भारतीय सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष एड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार कंधार शहरातील मुख्य रस्त्याने तिरंगा रॅली काढण्यात आली.


पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भाने वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष एड. बाळासाहेब आंबेडकर यांनी आपला वाढदिवस साजरा न करता पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध आणि भारत पाकिस्तान यांच्या मध्ये युद्धजन्य परिस्थिती तसेच शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली आणि भारतीय सैन्यांचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन केले होते.

त्यामुळे महाराष्ट्रातील त्यांचे कार्यकर्ते, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि वंचित बहुजन आघाडी च्या वतीने यांनी त्यांचा वाढदिवस साजरा न करता संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय सैन्यांचे मनोबल वाढवण्यासाठी तिरंगा रॅली काढण्याचे आव्हान केले होते. त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत दि. 11 मे 2025 रोजी कंधार शहरामध्ये भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शहराच्या मुख्य रस्त्याने तिरंगा ध्वज हातात घेऊन भारत माता की जय, वंदे मातरम, शहीद जवान अमर रहे, भारतीय संविधानाचा विजय असो,हम सब एक है अशा घोषणा शहराच्या मुख्य रस्त्याने तिरंगा रॅली काढण्यात आली.

ही तिरंगा रॅली भीमनगर कंधार येथून निघून कापड लाईन, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा मार्गे महाराणा प्रताप चौकातून परत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याकडे येऊन त्यांच्या पूर्णकृतीप्रिया पुष्पहार अर्पण करून राष्ट्रगीताने या रॅलीची सांगता झाली.

या रॅलीमध्ये. वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संतोष पाटील गवारे भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक विलास कांबळे, तालुकाध्यक्ष जितेंद्र ढवळे, दिलीप जोंधळे प्रेमानंद गायकवाड समता सैनिक दलाचे संरक्षण जिल्हा उपाध्यक्ष संजय सोनकांबळे, संरक्षण जिल्हा उपाध्यक्ष संतोष दुंडे, तालुका सरचिटणीस रुपेश कांबळे, महिला तालुका अध्यक्षा साधना येंगडे.
रमाताई कठारे, अनिता कदम, गंगासागर दिग्रसकर,ता सह सचिव.हमीद पठाण, वंचित चे ता उपअध्यक्ष राणाप्रताप पवळे, भारतीय बौद्ध महासभेचे एन.एन. कांबळे, आर.एन. गायकवाड, सुदाम मोडके, सामाजिक कार्यकर्ते माधव कांबळे, समता सैनिक दलाचे विलास सोनकांबळे, पांडुरंग सोनकांबळे, विलास ढवळे , राजरत्न कांबळे, अमोल कांबळे.यांच्यासह भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि सर्वसामान्य जनतेने या तिरंगा रॅलीमध्ये सहभाग नोंदवून भारतीय सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी घोषणा देत रॅलीमध्ये सहभाग नोंविला.