HomeनांदेडNarasimha Naroba Temple ; नृसिंह नरोबा मंदिर कौठा येथे नृसिंह जन्मोत्सव उत्साहात...

Narasimha Naroba Temple ; नृसिंह नरोबा मंदिर कौठा येथे नृसिंह जन्मोत्सव उत्साहात साजरा

नवीन नांदेड l श्री नृसिंह नरोबा मंदीर बसवेश्वर नगर जुना कौठा नांदेड येथे 11 में रोजी विधीवत पूजा, अभिषेक,पारायण किर्तन, भव्य मिरवणूक व सायंकाळी आयोजित महाआरतीने शैकडो भाविक भक्तांचा उपस्थित नृसिंह जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा झाला ,यावेळी फटाक्यांची आतिषबाजी व टाळ म‌दंगाचा किर्तनाने व जयघोषात भाविक भक्तांचा उपस्थित साजरा झाला यावेळी विश्वस्त समिती पदाधिकारी बालाजी देऊळगावकर यांच्या वतीने महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता.

नृसिंह जन्मोत्सव सोहळा निमित्ताने दरवर्षी प्रमाणे याही 15 व्या वर्षी 5 ते 12मे दरम्यान शिवपुराण कथा दररोज दुपारी दरम्यान व श्रीनृसिंह जन्मोत्सव निमित्ताने सप्ताहातील दैनिक कार्यक्रम काकडा पहाटे अभिषेक सकाळी ज्ञानेश्वर पारायण सकाळी गाथा भजन सकाळी शिवमहापुराण कथा दुपारी हरिपाठ सायं. हारी किर्तनकार आयोजित करण्यात आले होते.

नृसिंह जन्मोत्सव निमित्ताने 11 मे रोजी सकाळी महाअभिषेक, व श्री भव्य मिरवणूक मंदिर परिसर ते रवि नगर ते मुख्य मार्गावरून काढण्यात आली होती यावेळी विविध ठिकाणी भाविक भक्तांनी मिरवणूक पालखीचे पुजन करून स्वागत केले व दर्शन घेतले तर कौठा येथे काकडे परिवार यांच्या वतीने मिरवणूक मध्ये सहभागी झालेल्या भाविक भक्तांसाठी थंड मठ्ठा पेय वाटप करण्यात आले.

नृसिंह जन्मोत्सव निमित्ताने मंदिरावर व परिसरात भव्य रोषणाई करण्यात आली होती,तर सायंकाळी जन्मोत्सव निमित्ताने फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली होती या नंतर बालाजी देऊळगावकर यांच्या वतीने महाप्रसाद आयोजन करण्यात आले होते. नृसिंह जन्मोत्सव सोहळा प्रसंगी मंदिर अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य बळीरामपुर गंगाप्रसाद काकडे ,निळकंठ काळे,नरोजी काकडे ,बालाजी देऊळगावकर,मोहन काकडे, यांच्या सह ज मंदिर विश्वस्त समिती पदाधिकारी उपस्थित होते, जन्मोत्सव सोहळा यशस्वीतेसाठी साठी विश्वस्त समिती पदाधिकारी पुजारी व्यंकटेश मुळी गुरू यांनी परिश्रम घेतले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments