Narasimha Naroba Temple ; नृसिंह नरोबा मंदिर कौठा येथे नृसिंह जन्मोत्सव उत्साहात साजरा
नवीन नांदेड l श्री नृसिंह नरोबा मंदीर बसवेश्वर नगर जुना कौठा नांदेड येथे 11 में रोजी विधीवत पूजा, अभिषेक,पारायण किर्तन, भव्य मिरवणूक व सायंकाळी आयोजित महाआरतीने शैकडो भाविक भक्तांचा उपस्थित नृसिंह जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा झाला ,यावेळी फटाक्यांची आतिषबाजी व टाळ मदंगाचा किर्तनाने व जयघोषात भाविक भक्तांचा उपस्थित साजरा झाला यावेळी विश्वस्त समिती पदाधिकारी बालाजी देऊळगावकर यांच्या वतीने महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता.
नृसिंह जन्मोत्सव सोहळा निमित्ताने दरवर्षी प्रमाणे याही 15 व्या वर्षी 5 ते 12मे दरम्यान शिवपुराण कथा दररोज दुपारी दरम्यान व श्रीनृसिंह जन्मोत्सव निमित्ताने सप्ताहातील दैनिक कार्यक्रम काकडा पहाटे अभिषेक सकाळी ज्ञानेश्वर पारायण सकाळी गाथा भजन सकाळी शिवमहापुराण कथा दुपारी हरिपाठ सायं. हारी किर्तनकार आयोजित करण्यात आले होते.
नृसिंह जन्मोत्सव निमित्ताने 11 मे रोजी सकाळी...
