नांदेड l मुळचा नांदेड येथील प्रतीक संजयकुमार सोनवणे यांनी अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सॉस अॅट अर्लिग्टंन येथून एम.एस. डिग्री (इंजिनिअरींग) पूर्ण केली.


दोन वर्षांच्या कोर्समध्ये प्रतीक सोनवणे यांनी देदीप्यमान यश मिळवित अमेरिकेत नांदेडचे नाव उज्वल केले. तेथील विद्यापीठाचे मान्यवर पदाधिकारी तसेच प्राध्यापकांच्या हस्ते प्रतीक सोनवणे यांना पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

प्रतीक सोनवणे हे नांदेड मर्चन्टस् को-ऑप. बँकेतील संजयकुमार सोनवणे यांचा मुलगा आहे. प्रतीक यांचे प्राथमिक शिक्षण नागार्जुना पब्लिक स्कूल येथे झालेले आहे. तर बारावी नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय व इजिनिअरींगची पदवी एम.जी.एम. महाविद्यालय नांदेड येथून झालेली आहे. पुढील शिक्षणासाठी त्यांना अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सॉस अॅट अर्लिग्टंन येथे गुणवत्तेवर एम.एस.साठी प्रवेश मिळाला होता. या यशाबद्दल प्रतीक सोनवणे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतूक होत आहे.
