हदगांव, शेख चांदपाशा| महगाईचा वाढता प्रभाव लक्षात घेता काही दिवसावर आलेला खरिप हंगामात बियाणे व रासायनिक खतांचा काळाबाजार होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांत भीती निर्माण झाली असून, यासाठी हदगाव विधान सभाक्षेत्रचे आ.बाबूराव कदम कोहळीकर.यांनी कृषि विभागाची आढवा बैठक घ्यावी अशी मागणी तालुक्यातील शेतकरी करीत असतांना दिसून येत आहेत.


हदगाव तालुक्यात कडक उन्हाळा सुरू आहे. गेल्या काही दिवसापासून वातावरण बदलले असून, आता शेतकऱ्यांना पावसाची आस लागलेली आहे. येणार खरीप हंगाम फायदेशीर ठराव म्हणून शेतकरी उन्हात राब राब राबत आहे. तालूक्यातील शेतकऱ्यांना फक्त आता शेतीचा आधार उरलेला आहे. गत तीन ते चार वर्षांपासून पीकावर विविध रोग मुळे आवकाळी पाऊस शासनाचे पीक धोरण यामुळ शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे.

तर अनेक शेतकरी वर्ग खरिपाच्या तयारीला लागले असून, खाते बियाणे खरेदीसाठी दुकानदारांचे उंबरठे जिजवीत आहेत. यावर्षी कापसाचा पेरा कमी करुन बहुतांशी शेतकरी सोयाबीनकडे वळनार असल्याचे दिसून येत आहे. याबाबतीत तालुक्यातील कृषि विभागाकडे माहीती घेण्याचा प्रयत्न केला असता संबधीत कर्मचारी नेहमी प्रमाणे फिल्डवर असल्याचे सांगण्यात आले आहे.

यामुळे या हंगामात सोयाबीनचा पेरा व अन्य पिकांचा पेऱ्याचा अंदाज येऊ शकला नाही. तरी शेतकऱ्यांचा कल सोयाबीन कडे दिसून येत आहे. हि बाब लक्षात घेता सोयाबीनच्या बियाण्यांची काळाबाजार होण्याची दाट शक्यता आहे. त्यातच खुल्या बाजारात सोयाबीनचे भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी युरिया खताची वाढती मागणी पाहता काळ्या बाजारात चढ्याभावाने युरिया सहज मिळत होता. सध्याला महागाईने उग्ररुप धारण केल्याने खते, बियाण्यांबाबत आ. बाबूराव कदम कोहळीकरांनी यांनी कृषि विभागा बरोबर आढावा बैठक घ्यावी जेणेकरून मतदार संघात रासायनिक खते व बियाणांचा काळा बाजार होणार नाही अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
