Tricolor Rally : वंचित बहुजन आघाडी च्या वतीने कंधार मध्ये तिरंगा रॅली
कंधार, उस्माननगर, माणिक भिसे l श्रीनगर मध्ये पैलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला आणि शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली आणि भारतीय सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष एड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार कंधार शहरातील मुख्य रस्त्याने तिरंगा रॅली काढण्यात आली.
पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भाने वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष एड. बाळासाहेब आंबेडकर यांनी आपला वाढदिवस साजरा न करता पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध आणि भारत पाकिस्तान यांच्या मध्ये युद्धजन्य परिस्थिती तसेच शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली आणि भारतीय सैन्यांचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन केले होते.
त्यामुळे महाराष्ट्रातील त्यांचे कार्यकर्ते, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि वंचित बहुजन आघाडी च्या वतीने यांनी त्यांचा...
