नांदेड| राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी नांदेड विमानतळावर आगमन झाले. यावेळी उद्योग,सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार विक्रम काळे यांनी त्यांचे स्वागत केले.


यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार,मनपा आयुक्त महेशकुमार डोईफोडे आदींची उपस्थिती होती.
