Homeक्राईमNanded Firing ; नांदेडमध्ये पुन्हा गोळीबार झाला यात एक ठार; एक जखमी

Nanded Firing ; नांदेडमध्ये पुन्हा गोळीबार झाला यात एक ठार; एक जखमी

नांदेड। नांदेड शहर व परिसरात गुन्हेगारांनी पुन्हा डोके वर काढले यातून तीन जणांमध्ये वाद होऊन एकाने दुसऱ्यावर गोळीबार केला. या घटनेत एक जण ठार झाला तर अन्य एक गंभीर जखमी झाला आहे. वसरणी येथील जलशुद्धीकरण केंद्राजवळ रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

रविवार दि.११ मे रोजी सकाळी पुन्हा एकदा गोळीबार झाल्याने नांदेड शहर हादरले आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला आशु पाटील उर्फ कमलेश लिंबापुरे याच्यासह शेख परवेज, तेजासिंग बावरी या तिघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. प्रारंभी सुरू झालेला किरकोळ हा वाद टोकाला गेल्याने कमलेश लिंबापुरे उर्फ आशु पाटील याने शेख परवेज व तेजासिंग बावरी यांच्यावर गोळी झाडली.

IMG 20250511 WA0031 Nanded Firing ; नांदेडमध्ये पुन्हा गोळीबार झाला यात एक ठार; एक जखमी

यात शेख परवेज (वय २५ वर्ष) हा जागीच ठार झाला तर त्याच्यासोबत असलेला तेजासिंग बावरी हा जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी घटनास्थळाला भेट दिली असून, या गोळीबारात जखमी झालेल्या तेजासिंग बावरी याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन महिन्यापूर्वीच नांदेड शहरातील गुरुद्वारा परिसरात घडलेल्या गोळीबाराची चर्चा थंडावत असताना आज पुन्हां गोळीबार झाल्याने नांदेड शहर कधी गुन्हेगारी मुक्त होणार असा प्रश्न पुढे आला आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments