नायगाव| EKYC करण्यासाठी कडाक्याच्या थंडीत सर्वसान्य नागरिक रात्रीपासून बैंकेच्या बाहेर येऊन बसत आहेत, हा प्रकार गोरगरिबांसाठीच आहे का..?असा सवाल उपस्थित करून शासनाने याकडे लक्ष देऊन गोरगरिबांची EKYC करण्यासाठी होणारी अडचण दूर करावी अशी मागणी केशव मांजरमकर यांनी केली आहे.
येथे EKYC करण्यासाठी भयंकर थंडी मध्ये शेतकरी, नागरिक, लाभार्थी रात्री 2 पासून लाईन साठी जमा होत आहेत. हा प्रकार फक्त गोरगरिबांनाच आहे का..? जन धन खाते गरिबांचे तर त्यांना भरायला पैसे लागतात काढायला पैसे लागतात. मुख्य शाखेत त्यांना व्यवहार करण्यास नकार देऊन बँक च्या पाठीमागे Mini SBI bank मध्ये पाठवतात. तिथे पैसे दिल्या शिवाय कोणतीही काम होत नाही. रात्री बे रात्री वयोवृद्ध, लेकुरवाळे, गोरगरीब रोजगार वर्ग असलेल्या खातेदार यांना याचा खूप मानसिक त्रास होत आहे.
तरी आज पत्रकार दिनानिमित्त पत्रकार बांधवांनी व लोकप्रतिनिधी यांनी वाचा फोडून सामान्य जनतेला न्याय द्यावा अशी आर्ट हाक सोशल मीडियावर करण्यात आली आहे यहची सर्वत्र जोरदार चर्चा होते आहे. तसेच RBI अंतर्गत चालणाऱ्या बँकाना त्यांना त्यांचा नियम अटी नुसार KYC करणे अनिवार्य आहे. आम्ही मान्य करू पण त्यांना एक दिवसात किती KYC करणे होतात. तेवढेच बोलविणे आवश्यक आहे, अन्यथा प्रत्येक गावातील SBI Mini Branch KYC करणेसाठी अधिकार देणे किंवा शिबिर ठेवून काहीतरी वेगळा मार्ग काढावा अशी मागणी केशव पांडुरंग शिंदे मांजरमकर यांनी केली आहे.