Wednesday, May 13

Tag: One killed

Nanded Firing ; नांदेडमध्ये पुन्हा गोळीबार झाला यात एक ठार; एक जखमी

Nanded Firing ; नांदेडमध्ये पुन्हा गोळीबार झाला यात एक ठार; एक जखमी

क्राईम, नांदेड
नांदेड। नांदेड शहर व परिसरात गुन्हेगारांनी पुन्हा डोके वर काढले यातून तीन जणांमध्ये वाद होऊन एकाने दुसऱ्यावर गोळीबार केला. या घटनेत एक जण ठार झाला तर अन्य एक गंभीर जखमी झाला आहे. वसरणी येथील जलशुद्धीकरण केंद्राजवळ रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली असल्याने एकच खळबळ उडाली आहे. रविवार दि.११ मे रोजी सकाळी पुन्हा एकदा गोळीबार झाल्याने नांदेड शहर हादरले आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला आशु पाटील उर्फ कमलेश लिंबापुरे याच्यासह शेख परवेज, तेजासिंग बावरी या तिघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. प्रारंभी सुरू झालेला किरकोळ हा वाद टोकाला गेल्याने कमलेश लिंबापुरे उर्फ आशु पाटील याने शेख परवेज व तेजासिंग बावरी यांच्यावर गोळी झाडली. यात शेख परवेज (वय २५ वर्ष) हा जागीच ठार झाला तर त्याच्यासोबत असलेला तेजासिंग बावरी हा जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्ष...
error: Content is protected !!