Monday, May 18

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Bharatiya Janata Party ; भारतीय जनता पक्षाच्यावतीने पाण्यासाठी सिडको क्षेत्रीय कार्यालयवर संतप्त महिलासह नागरीकांच्या मोर्चा

Bharatiya Janata Party ; भारतीय जनता पक्षाच्यावतीने पाण्यासाठी सिडको क्षेत्रीय कार्यालयवर संतप्त महिलासह नागरीकांच्या मोर्चा

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड l सिडको हडको भागात गेल्या अनेक दिवसांपासून पासून पिण्याच्या पाणी पुरवठा न झाल्याने व प्रशासनाने टॅकरव्दारे पाणीपुरवठा न केल्याने संतप्त झालेल्या नागरीकांनी व महिलांनी सिडको पाण्याची टाकी ते क्षेत्रीय कार्यालय वर भाजपा पदाधिकारी वैजनाथ देशमुख,संजय पाटील घोगरे,सतिश पाटील बस्वदे,संजय इंगेवाड,राजु लांडगे. ललिता शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड घोषणाबाजी देत पाणी आमच्या हक्काचे,पाणी मिळाले पाहिजे घोषणा देत संतप्त महिलांनी पाण्याचे रिकामे भांडे घेत मोर्चा काढला यावेळी क्षेत्रीय कार्यालय येथे संबंधित अधिकारी कोणीही नसल्याने ऊशिरा आलेल्या सहाय्यक आयुक्त डॉ मिर्झा बेग व पाणीपुरवठा अभियंता प्रकाश कांबळे यांच्या मध्ये संवाद चालू असतानाच दोन्ही अधिकारी यांच्या अंगावर पाणी टाकून पाणी द्या टाहो फोडला अखेर दोन तासांनी पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले व काही भागात पाणी टॅकर व्दारे ...
Meeting on water Scarcity ; हिंगोलीचे खा. नागेश पाटील आष्टीकर यांच्या उपस्थितीत होणार 05 में रोजी हदगाव हिमायतनगर तालुक्यातील पाणीटंचाईची आढावा बैठक

Meeting on water Scarcity ; हिंगोलीचे खा. नागेश पाटील आष्टीकर यांच्या उपस्थितीत होणार 05 में रोजी हदगाव हिमायतनगर तालुक्यातील पाणीटंचाईची आढावा बैठक

नांदेड, राजकीय, हिंगोली
नांदेड, हदगाव, हिमायतनगर। नांदेड जिल्ह्यातील हदगाव हिमायतनगर मतदार संघात निर्माण झालेल्या तीव्र पाणी टंचाई संदर्भात हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी दिनांक 05 मे रोजी हदगाव येथील पंचायत समिती कार्यालयात दुपारी 12 वाजता अधिकारी, कर्मचारी यांची आढावा बैठक आयोजित केली आहे. या बैठकीमुळे मतदार संघातील जनतेची पाण्यासाठी होणारी थांबण्यासाठी मदत होणार असल्याचे सांगितले जात आहे. पैनगंगा नदीकाठी असलेल्या हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदार संघातील नदीकाठी असलेल्या गावात आणि प्रमुख दोन्ही शहरात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. हिमायतनगर येथे तर महिलांनी नगरपंचायत वर घागर मोर्चा काढून पाणी समस्या सोडवण्यासाठी नगरपंचायत कार्यालयात दोन तास ठिय्या मांडल्या होत्या. शहरातील जवळपास सर्वच प्रभागात सार्वजनिक व खाजगी बोरवेकलचे पाणी बंद झाले आहे. उष्णतेचे वाढते प्रमाण यामुळे नागरिक ह...
Clear Shiv roads and build ring roads : शिव रस्ते मोकळे करून रिंग रोड काढा.. शेतकर्यांचे अर्थिक नुकसान टाळा -संघर्ष समिती

Clear Shiv roads and build ring roads : शिव रस्ते मोकळे करून रिंग रोड काढा.. शेतकर्यांचे अर्थिक नुकसान टाळा -संघर्ष समिती

नांदेड, राजकीय
हदगांव, शेख चांदपाशा| तालुक्यातील सात गाव करिता शहराच्या परिसरातील शिवरस्ता मोकळा करावा अशी मागणी संघर्ष समितीचे अध्यक्ष आत्माराम जाधव यांनी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांना निवेदन देऊन केली. त्यांनी दि. 30 एप्रील 2025 च्या दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हदगांव तालुक्यातील वाटेगांव, बनचिंचोली, गोर्लेगांव, बाभळी, गुरफळी, बेलमंडळ, कोथळा या सात गांवामध्ये उसाची लागवड भरपुर प्रमाणात आहे. त्यामुळे सदर उसाची वाहाने साखर कारखाण्यास नेण्याकरीता व इतर पिकांच्या (सोयाबीन, हरभर, तुर ईत्यादी) मालाची विक्री करण्यासाठी हदगांव शहराच्या मुख्य बाजार पेठे मधुन जावे लागत. हदगांव शहरामधील रस्ते हे अत्यंत कमी रूंदीचे म्हणजेच १० फुटाचे असुन, सदर रस्त्यावर जड वाहने नेतांना वाहन धारकांना जिव मुठीत ठेवुन सदर रस्त्यावर प्रवास करावा लागतो. तसेच सदर रस्त्यांवर बरीच जिवीत हानी झाली आहे. हा रस्ता अर...
Shekh Afroz Demand ; मुस्लिम समाजाच्या उन्नतीसाठी मार्टी संस्थांची अंमलबजावणी व्हावी – युवासेना अल्पसंख्याक तालुका प्रमुख शेख अफरोज

Shekh Afroz Demand ; मुस्लिम समाजाच्या उन्नतीसाठी मार्टी संस्थांची अंमलबजावणी व्हावी – युवासेना अल्पसंख्याक तालुका प्रमुख शेख अफरोज

नांदेड, राजकीय
हिमायतनगर, अनिल मादसवार। महाराष्ट्र शासनाने दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी अल्पसंख्यांक संशोधन प्रशिक्षण संस्था "मार्टी" स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. हि संस्था राज्यातील अल्पसंख्यांक समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व व्यावसायिक सशक्तीकरणासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र संस्थेकडून कार्यक्षम होण्यासाठी दिरंगाई चालविली जात आहे. ही बाब लक्षात घेता मुस्लिम समाजाच्या उन्नतीसाठी मार्टी संस्थांची अंमलबजावणी तात्काळ व्हावी अशी मागणी युवासेना अल्पसंख्याक तालुका प्रमुख शेख अफरोज यांनी आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे. या संस्थेसाठी शासनाने १६ पदे मंजूर केली असून, ६.२५ कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर केला, मात्र ही संस्था अद्याप कार्यक्षम झाली नाही. कार्यालय नाही....अधिकारी व कर्मचारी नियुक्त झाले नाही....परिणामी योजनांची अंमलबजावणी केली गेली नसल्याने. अल्पसंख्याक...
MLA Chikhlikar : लोहा उप रुग्णालयाचा बेभरवशाची रुग्ण सुविधा :आमदार चिखलीकरांची थेट राज्याच्या आरोग्य सचिवाकडे तक्रार

MLA Chikhlikar : लोहा उप रुग्णालयाचा बेभरवशाची रुग्ण सुविधा :आमदार चिखलीकरांची थेट राज्याच्या आरोग्य सचिवाकडे तक्रार

राजकीय, नांदेड
लोहा| लोहा उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य सुविधांचा बोजवारा उडाला असून वैद्यकीय अधीक्षक ,डॉक्टर मुख्यालयी राहत नाहीत वेळेवर रुग्णालयाला उपचार मिळत नाहीत .अनेक रुग्ण नातेवाईक दररोज थेट प्रतापरावांना दवाखान्याच्या तक्रारी करत असतात.असुविधा , तक्रारीचा ढीग , डॉक्टर वेळेवर नसतात त्यामुळे येथे उपाचाराला येणारे लोक त्रस्त झाले आहेत .त्याची दाखल घेत रविवार दुपारी आमदार प्रतापराव पाटील यांनी रुग्णालयाची पाहणी केली.असुविधा व तक्रारी पाहता स्वतः राज्याच्या आरोग्य सचिवाला येथील वैदयकीय अधीक्षक व डॉक्टर याची बदली करा असे सूचित केले. जिल्हाशक्यचिकित्सक यांनी लक्ष घालावे तसेच पाण्याची तात्काळ सुविधा करण्याचे निर्देश दिले. लोहा उपजिल्हा रुग्णालयाच्या वाढत्या तक्रारीची दाखल घेत आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी रविवारी दवाखान्याच्या भेट दिली .,उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नीळक...

Hadgaon ; हदगाव तालुक्यातील एकूण 118 ग्रामपंचायतिच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

नांदेड, राजकीय
हदगांव, शेख चांदपाशा। हदगाव तालुक्यातील एकूण 118 ग्रामपंचायत मधून सर्वप्रथम अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी आरक्षणाची कारवाई सुरू करण्यात आली होती. यासाठी एकूण ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या टक्केवारीच्या उतरत्या क्रमाने घेण्यात आली. सन 2005 2010 2015 2020 या वर्षामध्ये च्या ग्रामपंचायतींना अणू -जाती या प्रवर्गासाठी आरक्षण देण्यात आले होते. अशा ग्रामपंचात तिला वगळण्यात आलेल्या व उर्वरित ग्राम पंचायतमध्ये चक्राकार पद्धतीने अनुसूचित जातीसाठी खालील प्रमाणे आरक्षण सोडण्यात आल्याची माहीती तहसिलदार सुरेखा नांदे यांनी दिली. संरपंच पदाचे 2025 ते 2030 करिता तालुक्यातील 118 ग्रामपंचायत मधून अनु जाती 26. अनु.- जाती महिला13. अनु- जमाती 15. अनु जमाती महिला08. नामप्र 18. नामप्र.9 खुला 59. खुला महीला 30. अनुसुचित जाती आरक्षण दिग्रस. शिऊर. बेलमंडळ तामसा फळी निवळा लोहा लोहा तांडा, भाणेगाव भानेगांव तांडा....
Women rule in 27 Gram Panchayats : हिमायतनगर तालूक्यातील 27 ग्रामपंचायतीत महिला राज; २५ ग्रामपंचायती पुरुषासाठी

Women rule in 27 Gram Panchayats : हिमायतनगर तालूक्यातील 27 ग्रामपंचायतीत महिला राज; २५ ग्रामपंचायती पुरुषासाठी

नांदेड, राजकीय
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्यातील 52 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांच्या उपस्थितीत तहसीलदार पल्लवी टेमकर यांनी आरक्षण सोडत जाहीर केली आहे. यात तालूक्यातील 27 ग्रामपंचायतीत महिला राज तर 25 ग्रामपंचायती पुरुषासाठी पुरुषांसाठी आरक्षण जाहीर झाले आहे. तालूक्यात महिलाराज आले असले तरी बहुतांश महिलांचे नौरोबाचा कारभार पाहणार असल्याने महिला सक्षमीकरण नावालाच अशी चर्चा सरपंच सोडत ठिकाणी ऐकू येत होती. दिनांक 25 रोजी हिमायतनगर तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सरपंच पदासाठीच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी खालील प्रमाणे प्रवर्गनिहाय आरक्षण सांगून ग्रामपंचायत निहाय आरक्षण चिठ्ठी काढून सोडत जाहिर करण्यात आली आहे. एकूण 52 ग्रामपंचायती पैकी 27 जागा महिलासाठी तर 25 जागा पुरुषासाठी सोडण्यात आल्या आहेत. अनुसू...
Sarpanch post draw : 25 एप्रिलला होणार सरपंच पदाची सोडत; तहसिल निहाय वेळापत्रक जाहीर

Sarpanch post draw : 25 एप्रिलला होणार सरपंच पदाची सोडत; तहसिल निहाय वेळापत्रक जाहीर

नांदेड, राजकीय
नांदेड, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत शुक्रवार 25 एप्रिल रोजी होणार आहे. या संदर्भात जिल्हा प्रशासनाने आज वेळापत्रक जाहीर केले आहे. 5 मार्च 2025 ते 4 मार्च 2030 दरम्यान नांदेड जिल्ह्यात सार्वत्रिक निवडणुकीद्वारे गठीत होणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी हे आरक्षण लागू असणार आहे. नांदेड जिल्‍हयातील सर्व 16 तालुक्‍यामध्‍ये शुक्रवार 25 एप्रिल 2025 रोजी तहसिल स्‍तरावर प्राधिकृत अधिकारी तथा तहसिलदार यांच्याद्वारे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व ना.मा.प्र पदाकरिता महिला आरक्षणासह सरपंच पदाकरिता सोडत कार्यक्रम संबंधित तहसिलदार यांच्‍या अधिपत्‍याखाली संबधीत तालुक्‍यांच्‍या उपविभागीय अधिकारी यांच्‍या नियंत्रणात पुढील प्रमाणे पार पडणार आहे. सर्व संबंधित नागरिकांनी व ग्रामपंचायत सदस्‍यांनी सदरचे सोडतीस उपस्थित राहण्‍याचे जिल्‍हाधिकारी नांदेड यांचेकडून आवाहन क...
BJP : भाजपा संघटनमंत्री कोडगे यांचा वाढदिवस निमित्ताने विद्यार्थ्यांना वही, पेन, रुग्णांना फळ वाटप

BJP : भाजपा संघटनमंत्री कोडगे यांचा वाढदिवस निमित्ताने विद्यार्थ्यांना वही, पेन, रुग्णांना फळ वाटप

नांदेड, राजकीय
हिमायतनगर| भारतीय जनता पार्टीचे मराठवाडा संघटन मंत्री संजयजी कोडगे यांच्या वाढदिवसानिमित्त हिमायतनगर भाजपातर्फे शालेय विद्यार्थ्यांना वही, पेन, आणि शासकीय रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. नांदेड जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचे संघटन अधिक मजबूत व्हावे यासाठी मराठवाडा संघटनमंत्री संजयजी कोडगे काम करत आहेत. भारतीय जनता पार्टीच्या सदस्य नोंदणी अभियानात नांदेड जिल्ह्यातील कार्यकर्त्यान कडून उत्कृष्ठ काम करून घेतल्यामुळे ते सर्व परिचित झाले आहेत. दिनांक 22 एप्रिल रोजी त्यांच्या वाढदिवसा निमित्ताने हिमायतनगर भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष गजानन चायल यांच्या पुढाकारातून शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील 500 विद्यार्थ्यांना वही पेन वाटप करून तेथील एकल पालकांचे पालकत्व स्वीकारले आहे. असेच हिमायतनगर येतील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप क...
Chhatrapati Sambhaji Maharaj ; छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक नांदेड शहरात बनवा सकल मराठा समाजाकडून पालकमंत्र्यांना निवेदन

Chhatrapati Sambhaji Maharaj ; छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक नांदेड शहरात बनवा सकल मराठा समाजाकडून पालकमंत्र्यांना निवेदन

नांदेड, राजकीय
नांदेड l नांदेड जिल्हा हे चळवळीचे केंद्र बिंदू असुन या जिल्ह्यात प्रत्येक महापुरुषांच्या आदर्शाने सर्व समाजातील समाज बांधव आप आपली चळवळ चालवत असतात, प्रकर्षाने नांदेड शहरात अनेक महापुरुषांचे स्मारकं आहेत परंतु शहरात कुठेही छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक नाही. या अनुषंगाने आज जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अतुल सावे साहेब हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर आले असता सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन देत सविस्तर चर्चा करण्यात आली, की महामानवांच्या विचारांना त्यांच्या स्मृतीला किमान जयंती पुण्यतिथी च्या दिनी तरी अभिवादन करण्यासाठी त्यांचे स्मारक हे शहरात असणे गरजेचे आहे. नांदेड शहर हे शिक्षणाचे हब बनले असुन या शहरात शिक्षण घेण्यासाठी बाहेर गावातून तसेच अनेक ग्रामीण भागातून कित्येक विद्यार्थी विद्यार्थिनी येत असतात अशा शालेय व महाविद्यालयीन जिवनात ज्या महापुरुषांच्या विचारांना त्यांच्या स्मृतीना आपण उजा...
error: Content is protected !!