HomeनांदेडBharatiya Janata Party ; भारतीय जनता पक्षाच्यावतीने पाण्यासाठी सिडको क्षेत्रीय कार्यालयवर संतप्त...

Bharatiya Janata Party ; भारतीय जनता पक्षाच्यावतीने पाण्यासाठी सिडको क्षेत्रीय कार्यालयवर संतप्त महिलासह नागरीकांच्या मोर्चा

नवीन नांदेड l सिडको हडको भागात गेल्या अनेक दिवसांपासून पासून पिण्याच्या पाणी पुरवठा न झाल्याने व प्रशासनाने टॅकरव्दारे पाणीपुरवठा न केल्याने संतप्त झालेल्या नागरीकांनी व महिलांनी सिडको पाण्याची टाकी ते क्षेत्रीय कार्यालय वर भाजपा पदाधिकारी वैजनाथ देशमुख,संजय पाटील घोगरे,सतिश पाटील बस्वदे,संजय इंगेवाड,राजु लांडगे.

ललिता शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड घोषणाबाजी देत पाणी आमच्या हक्काचे,पाणी मिळाले पाहिजे घोषणा देत संतप्त महिलांनी पाण्याचे रिकामे भांडे घेत मोर्चा काढला यावेळी क्षेत्रीय कार्यालय येथे संबंधित अधिकारी कोणीही नसल्याने ऊशिरा आलेल्या सहाय्यक आयुक्त डॉ मिर्झा बेग व पाणीपुरवठा अभियंता प्रकाश कांबळे यांच्या मध्ये संवाद चालू असतानाच दोन्ही अधिकारी यांच्या अंगावर पाणी टाकून पाणी द्या टाहो फोडला अखेर दोन तासांनी पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले व काही भागात पाणी टॅकर व्दारे पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे सांगितले, यावेळी पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या सह सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय कांबळे व पोलीस कर्मचारी यांनी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

सिडको हडको परिसरातील अनेक भागात पाणी पुरवठा गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून बंद असल्याने व प्रशासनाने कोणतीही पुर्व सुचना न दिल्याने अनेक कुटुंबांना पिण्याच्या पाण्याचा साठा करतांना दमछाक झाली व नाहक त्रास सहन करावा लागला आहे त्यातला त्यात परिसरातील अनेक हातपंप बंद असल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली सतत होणाऱ्या पाणी पुरवठा टंचाई प्रश्नी अखेर भाजपा पदाधिकारी वैजनाथ देशमुख.

संजय घोगरे,सतिश पाटील बस्वदे,संजय इंगेवाड,राजु लांडगे,ललिता शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संतप्त महिलांनी व नागरीकांनी सिडको पाण्याची टाकी ते मनपा सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे मोर्चा काढला यावेळी पाणी आमच्या हक्काचे, पाणी पुरवठा सुरळीत करा, घोषणा दिल्या यावेळी धिरज स्वामी, नारायण कौलंबीकर,विजयाताई गोडघासे,मोनु जोशी,भुजंग मोरे,सुमन पवार,गजानन कते,नितीन वाघमारे,मंगेश कदम ,आंनदा वाघमारे,सुरेश मुसळे, शिवराज देशमुख,ऋषीकेश महाजन यांच्या ऊधोजक माधव डोपंले, महिला युवक,पुरूष मोठ्या संख्येने सहभागी होते.

यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी मोर्चाला संबोधित न केल्याने व वेळेवर न आल्याने अखेर क्षेत्रीय कार्यालया टाळे ठोकले व ऊशिरा आलेल्या सहाय्यक आयुक्त डॉ मिर्झा बेग व पाणीपुरवठा अभियंता प्रकाश कांबळे यांच्याशी पाणी पुरवठा सुरळीत चालू करणे व टॅकर व्दारे पाणीपुरवठा द्या चर्चा होत असतांनाच संतप्त मोर्चातील काही जणांनी संबंधित अधिकारी यांच्या अंगावर पाणी टाकून पाणी पुरवठा सुरळीत करा अशी मागणी केली.

अखेर पाणी पुरवठा प्रश्नी पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या उपस्थितीत दोन्ही अधिकारी यांनी दोन तासांच्या आत पाणी पुरवठा सुरळीत चालू करण्याचे व काही भागात टॅकर व्दारे पाणीपुरवठा व बंद असलेले हातपंप चालू करण्याचे आश्वासन दिले. यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्या वतीने महिला व पोलीस कर्मचारी यांनी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments