HomeनांदेडIn Maharashtra State Road Transport Corporation : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात; ए‍क...

In Maharashtra State Road Transport Corporation : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात; ए‍क वर्षासाठी प्रशिक्षणार्थी शिकाऊ उमेदवारांची भरती

नांदेड| महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड विभागात सन 2025-26 या सत्रासाठी वेगवेगळया व्यवसायासाठी एक वर्षासाठी प्रशिक्षणार्थी शिकाऊ उमेदवारांसाठी भरती करण्यात येणार आहे. या शिकाऊ उमेदवार भरतीत नांदेड जिल्ह्यातील आयटीआय/अभियांत्रिकी पदवी, पदवीका उत्तीर्ण उमेदवारांचीच शिकाऊ उमेदवार म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. नांदेड जिल्ह्याव्यतीरीक्त इतर जिल्हयातील आयटीआय/अभियांत्रिकी पदवी, पदवीका उत्तीर्ण उमेदवारांचा अर्ज व मागील तीन वर्षापुर्वी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचा अर्ज विचारात घेतला जाणार नाही, असे राज्य परिवहन विभागाचे विभाग नियंत्रक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

यात मेकॅनिक मोटर व्हेईकल -45, मेकॅनिक डिझेल- 42,  शिट मेटल वर्क्स-18, ॲटो इलेक्ट्रीशियन-6, मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडीशनर-8, पेंटर(जनरल) -4, वेल्डर (गॅस ॲन्ड इलेक्ट्रीक)-04, अभियांत्रिकी पदवी, पदविका (मेकॅनिकल ॲटोमोबाईल मेकॅनिक /इंजिनीअर)-2 अशी एकुण 129 पदे ऑनलाईन पध्दतीने भरण्यात येणार आहेत. (अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती व दिव्यांगासाठी शिकाऊ उमेदवार कायद्यानुसार जागा आरक्षीत आहेत.)

त्यासाठी आयटीआय उत्तीर्ण किंवा शिकाऊ उमेदवार भरती करण्यात येणाऱ्या विहीत केलेल्या व्यवसायाचे व्होकेशनल अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या व अॅटो इंजिनिअरींग टेक्निशिअन कोर्स उत्तीर्ण उमेदवारांना www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाईटवर स्वत: चे रजिस्ट्रेशन करावे अभियांत्रिकी पदवी, पदवीका उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांनी NATS पोर्टलवरील www.mhrdnats.gov.in या वेबसाईटवर स्वत:चे रजिस्ट्रेशन करावे. व रजिस्ट्रेशन झाल्यावर एमआरटीसी डिव्हीजन नांदेड या आस्थापनेकरीता ऑनलाईन अप्लाय करुन रा.प. महामंडळाने विहीत नमुन्यातील छापील अर्ज भरुन सादर करणे आवश्यक राहील. हे छापील अर्ज 27 फेब्रुवारी ते 10 मार्च 2025 रोजी 3 वाजेपर्यंत शनिवार, रविवार व सुटटीचा दिवस विभाग नियंत्रक यांचे कार्यालय रा.प.नांदेड येथे मिळतील व लगेच स्वीकारले जातील. या अर्जाची किंमत खुल्या प्रवगाकरीता 590 रुपये व मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी जातीचा दाखला सादर केल्यास 295 रुपये आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments