हिमायतनगर | हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय हिमायतनगर येथेआज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या थाटामाटात संपन्न झाली.सुरुवातीला मंचावरील मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ . उज्ज्वला सदावर्ते मॅडम अध्यक्ष म्हणून लाभल्या तर प्रमुख वक्ते डॉ. शेख शहेनाज मॅडम यांनी आपल्या मनोगतातून राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या चरित्रावर प्रकाश टाकला.

दुसरे वक्ते डॉ. के बी पाटील यांनी स्वामी विवेकानंद व त्यांच्या जीवनावरती प्रकाश टाकला व शिकागो येथील प्रसंग आपल्या मनोगतातून व्यक्त केला.
त्याचप्रमाणे प्रमुख वक्ते डॉ . व्ही व्ही कदम यांनी राष्ट्रमाता जिजाऊ यांचा संपूर्ण जीवन काळ कशाप्रकारे संघर्षमय शहाजीराजे व छत्रपती शिवाजी महाराज सोबत अनेक उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना आजची जिजाऊ व त्यावेळेस ची जिजाऊ कशी होती याबद्दल सविस्तर माहिती दिली.

अध्यक्षीय समारोप मध्ये महाविद्यालयाच्या प्राचार्या सदावर्ते मॅडम यांनी खरोखरच राष्ट्रमाता जिजाऊ त्यांचे विचार आचरण व आजच्या पिढीचे आचरण यावरती प्रकाश टाकला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर डी . सी देशमुख यांनी केले.सूत्रसंचालन डॉ.आशिष दिवडे तर आभार प्रदर्शन डॉ. संगपाल इंगळे यांनी केले कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.