नवीन नांदेड l नांदेड पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार,यांनी दरोड्याचा गुन्हा उघडकीस आणण्याचे पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते यात पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथील पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांचे मार्गदर्शना खाली पो.स्टे.नांदेड ग्रामीण येथील गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी चार वाहना सह किमती 1,85,500/- रुपयेचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती वरून दि 10 जानेवारी रोजी रोजी वेळ रात्रो 11:30 वाजताचे सुमारास PVR टाकीचे बाजुस रोडवर नवीन कौठा, नांदेड गुन्ह्यातील अज्ञात आरोपीतांचा व मालाचा शोध घेत असताना गोपनीय माहितीचे आधारे गुन्हयातील पाच आरोपीस ताब्यात घेतले असून यात दर्शन अंकुशराव टाक वय 21 वर्ष व्यवसाय शिक्षण रा. शंकरनगर, वसरणी ता. जि. नांदेड, अभिजीत नामदेश चव्हाण वय 20 वर्ष व्यवसाय खाजगी नौकरी रा. शंकरनगर, वसरणी, नांदेड, आदित्य रामंदास सोनमनकर वय 18 वर्ष, व्यवसाय शिक्षण रा. सिध्दनाथपुरी शंकराचार्य मठ चौफाळा, नांदेड, प्रसाद दत्ता फुलारी वय 22 वर्ष व्यवसाय शिक्षण रा.महेबुब नगर, बायपास रोड माळटेकडी रेल्वे स्टेशन, नांदेड, महेश आनंदा शिंदे वय 21 वर्ष व्यवसाय शिक्षण रा.शंकरनगर वसरणी, नांदेड यांच्या ताब्यातुन जबरीने चोरी केलेली एक आक्टीव्हा स्कुटी क्रमांक MH-26 BV-9868 किमती 25,000/- रुपये, व गुन्हयात वापरलेल्या दोन मोटार सायकल व एक स्कुटी व एक लोखंडी खंजर असे एकुण किमती 1,85,500/- रुपयेचा मुद्देमाल जप्त केला .

फिर्यादी पुरुषोत्तम दिपक कापरे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून गु.र.नं. व कलम44/2025 कलम 310(2), 309(6), 352,324(4), 324(5), 3(5) भारतीय न्याय संहिता -2023, सहकलम 4,7,25 शस्त्र अधिनियम नुसार पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस उप निरीक्षक,महेश कोरे हे करीत असून हा गुन्हा उघडकीस आणण्या साठी पोहेकॉ वाकडे, पोहेकॉ सत्तार,पोहेकॉ सुनील गटलेवार, पोकॉ माने,पोकॉ यांनी मेहनत घेतली आहे केलेल्या कामगिरी बदल अबिनाश कुमार,पोलीस अधिक्षक खंडेराव धरणे अप्पर पोलीस अधीक्षक भोकर,सुरज गुरव अप्पर पोलीस अधीक्षक नांदेड, सुशील कुमार नायक उपविभागीय पोलीस अधिकारी,उपविभाग इतवारा यांनी अभिनंदन केले आहे.
