In Maharashtra State Road Transport Corporation : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात; एक वर्षासाठी प्रशिक्षणार्थी शिकाऊ उमेदवारांची भरती
नांदेड| महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड विभागात सन 2025-26 या सत्रासाठी वेगवेगळया व्यवसायासाठी एक वर्षासाठी प्रशिक्षणार्थी शिकाऊ उमेदवारांसाठी भरती करण्यात येणार आहे. या शिकाऊ उमेदवार भरतीत नांदेड जिल्ह्यातील आयटीआय/अभियांत्रिकी पदवी, पदवीका उत्तीर्ण उमेदवारांचीच शिकाऊ उमेदवार म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. नांदेड जिल्ह्याव्यतीरीक्त इतर जिल्हयातील आयटीआय/अभियांत्रिकी पदवी, पदवीका उत्तीर्ण उमेदवारांचा अर्ज व मागील तीन वर्षापुर्वी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचा अर्ज विचारात घेतला जाणार नाही, असे राज्य परिवहन विभागाचे विभाग नियंत्रक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
यात मेकॅनिक मोटर व्हेईकल -45, मेकॅनिक डिझेल- 42, शिट मेटल वर्क्स-18, ॲटो इलेक्ट्रीशियन-6, मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडीशनर-8, पेंटर(जनरल) -4, वेल्डर (गॅस ॲन्ड इलेक्ट्रीक)-04, अभियांत्रिकी पदवी, पदविका (म...
