HomeनांदेडWomen rule in 27 Gram Panchayats : हिमायतनगर तालूक्यातील 27 ग्रामपंचायतीत महिला...

Women rule in 27 Gram Panchayats : हिमायतनगर तालूक्यातील 27 ग्रामपंचायतीत महिला राज; २५ ग्रामपंचायती पुरुषासाठी

हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्यातील 52 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांच्या उपस्थितीत तहसीलदार पल्लवी टेमकर यांनी आरक्षण सोडत जाहीर केली आहे. यात तालूक्यातील 27 ग्रामपंचायतीत महिला राज तर 25 ग्रामपंचायती पुरुषासाठी पुरुषांसाठी आरक्षण जाहीर झाले आहे. तालूक्यात महिलाराज आले असले तरी बहुतांश महिलांचे नौरोबाचा कारभार पाहणार असल्याने महिला सक्षमीकरण नावालाच अशी चर्चा सरपंच सोडत ठिकाणी ऐकू येत होती.

दिनांक 25 रोजी हिमायतनगर तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सरपंच पदासाठीच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी खालील प्रमाणे प्रवर्गनिहाय आरक्षण सांगून ग्रामपंचायत निहाय आरक्षण चिठ्ठी काढून सोडत जाहिर करण्यात आली आहे. एकूण 52 ग्रामपंचायती पैकी 27 जागा महिलासाठी तर 25 जागा पुरुषासाठी सोडण्यात आल्या आहेत. अनुसूचित जातीसाठी एस्सी 7 पैकी 4 महिला राखीव तर अनुसूचित जमाती एसटी 10 पैकी 5 महिला तर ओबीसी 9 पैकी 5 महिला ओपन 26 पैकी 13 महिला अशा एकूण महिलांना 27 तर 25 पुरुष असे 52 ग्रामपंचायतीचे आरक्षण जाहीर झाले असल्याचे सांगीतले आहे.

ग्रामपंचायत निहाय आरक्षण खालील प्रमाणेअनुसूचित जाती sc महिलासाठीची गावे वारंगटाकळी, दाबदरी, एकंबा, पोटा बु, sc पुरुष करंजी, घारापूर, शिबदरा ज., अनूसूचित जमाती st महिला टेंभूर्णी, धानोरा ज., खडकी बाजार, डोल्हारी, सोनारी, st पुरुष शिरपल्ली, बोरगडी, जवळगाव, विरसणी, खैरगाव ज., ओबीसी महिला पारवा बु., टाकराळा बु., पार्डी ज., चिंर्चोडी, महादापूर, ओबीसी पुरुष सरसम बु., बोरगाव ता., दरेगाव, खैरगाव ता., ओपन महिला वाघी, एकघरी ,जिरोना, कार्ला पी. दुधड, सवना ज., वडगाव ज., बळीराम तांडा, पळसपूर, कामारी, दरेसरसम, काडंली खु., कौठा ज.,

ओपन पुरुष वाई, वाशी, टेंभी, कामारवाडी, मंगरुळ, वटफळी, कांडली.बु., दिघी,आंदेगाव, पोटा खु., पारवा खु., पवना, सिरंजनी, असे सरपंच पदाचे आरक्षण जाहिर करण्यात आले आहे. अनेक आदिवाशी गावात ओबीसी आरक्षण सुटल्यामुळे जिल्हाधिकारी यांना भेटून समाधान नाही झाले तर काही बांधव कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत. एकूणच जाहीर झालेल्या आरक्षणामुळे अनेकांच्या अपेक्षेवर पाणी फिरले असून, आता आरक्षणातील कमकूवत उमेदवाराला उभे करुन आपल्या हाती रिमोटवर कारभार पाहाण्याचा मनसूबा दिसून येत आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments