Even though summer ; उन्हाळा सुरू झाला तरी हदगांव शहरातील शासकीय कार्यालये पाण्याविना…..!

हदगांव, शेख चांदपाशा। एकीकडे शासनाच्या जल जीवन मिशन अभियानाच्या माध्यमातून घराघरात शुद्ध पाणी पोहोचविण्याचे उद्दिष्ट आहे. अनेक गावांत लाखो रुपये खर्चुन याचे कामही सुरू आहे. असे असताना दुसरीकडे मात्र शहरातील अनेक महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांत कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होतांना दिसून येत नाही. त्यामुळे या नागरिकांवर कोणी पाणी देता का..? पाणी, असे म्हणत भटकंती करण्याची वेळ आली आहे.

मार्च महिना सुरू होताच उन्हाची चाहूल लागली आहे, दिवसेंदिवस उष्णतेचा पारा चढत असून, पिण्यासाठी पाणी आवश्यक असताना मात्र शहरातील काही महत्त्वाच्या शासकीय कार्यालयात नागरिकांना पाणी मिळत नाही. ही वस्तुस्थिती आहे, शासनाद्वारे थंड व शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी मशीन प्राप्त झाल्या. पण अल्पावधीतच योग्य देखभाली अभावी व पाणीटंचामुळे या मशीन जागेवरच खराब होत आहेत. त्यामुळे अनेकदा कार्यालयातील कर्मचारी यांना पिण्यासाठी पाण्याची बसोय आहे, पण बाहेर गावाहून येणाऱ्याना तहान भागविण्यासाठी भटकंती कराव लागत आहे.

मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उन्हाची दाहकता वाढली असून, एप्रिलमध्ये तर तापमानात वाढ झाली आहे. तालुक्यातील अनेक गावांतील नागरिक कामानिमित्त शासकीय निमशासकीय कार्यालये, बँकांत येतात. परंतु बहुसंख्य प्रशासकीय कार्यालयात नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने नागरिकांना कोरडा घसा ओला करण्यासाठी विकतचे पाणी घेऊन खिशाला झळ सोसावी लागत आहे. ग्रामीण शहरी भागात स्वच्छ पाणी, स्वच्छतागृहाची सुविधा नागरिकांना पुरविण्यासाठी ज्या कार्यालयातून पाठपुरावा होतो, तीच कार्यालये मात्र स्वतः कोरडी असल्याचे चित्र आहे दिसून येत आहे.

जिल्हा प्रशासन लक्ष का देत नाही..?
विविध माध्यमाद्वारे वर्तमानपत्राद्वारे नागरिकांच्या जिवलग प्रश्नावर विविध माध्यमाचे प्रतिनिधी पोट तिडकीने प्रश्न मांडत असतात. परंतु त्याची दखल तालुका पातळीवर तर होतच नाही. जिल्हा प्रशासन देखील या ज्वलंत प्रश्नाला गांभीर्याने का घेत नाही हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तालुका स्तरावर कोणता राजकीय नेता आला की… त्याला थंड पाण्याची सोय करण्यात येते. परंतु ग्रामीण भागातून आलेल्या सामान्यांना ही सोय प्रशासनाद्वारे का..? करण्यात येत नाही. असा संतप्त सवाल नागरिक करत असताना दिसून येत आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button