HomeनांदेडDr. B. R. Ambedkar Jayanti : सार्वजनिक भीम जयंती मंडळ, डॉ. आंबेडकर...

Dr. B. R. Ambedkar Jayanti : सार्वजनिक भीम जयंती मंडळ, डॉ. आंबेडकर नगरची कार्यकारिणी जाहीर

नांदेड| डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Dr.B. R. Ambedkar) यांच्या जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर डॉ. आंबेडकर नगर येथे सार्वजनिक भीम जयंती मंडळाची बैठक उत्साहात पार पडली. ही बैठक नगरसेवक सत्यपाल सावंत व नगरसेवक राहुल सोनसळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अशोक कांबळे होते.

बैठकीत यंदाचा भीम जयंती उत्सव मोठ्या उत्साहात, शिस्तबद्ध आणि विविध समाज उपयोगी उपक्रमांसह साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच मंडळाची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

नवीन कार्यकारिणीनुसार अध्यक्षपदी सिद्धोधन सावंत, उपाध्यक्षपदी अभिजीत गायकवाड, कोषाध्यक्षपदी सुभाष कांबळे, सचिवपदी संदेश मोरे तर संघटकपदी देवानंद मोगले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सदस्य म्हणून शादु लोणे यांची निवड झाली आहे.

मंडळाचे सल्लागार म्हणून ईश्वर सावंत, अशोक कांबळे, चंद्रकांत कांबळे, सुभाष गजभारे आणि किशोर हटकर यांची नियुक्ती करण्यात आली.

या बैठकीला परिसरातील अनेक ज्येष्ठ नागरिक तसेच तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. सर्वांच्या एकमताने कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यावेळी भीम जयंती उत्सव समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणारा व आदर्श पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांनी केले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments