HomeनांदेडGudhi padwa : पतंजली तर्फे नांदेडमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्ताने १११ कुंडी विश्वशांती यज्ञ

Gudhi padwa : पतंजली तर्फे नांदेडमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्ताने १११ कुंडी विश्वशांती यज्ञ

नांदेड| नववर्ष गुढीपाडव्याच्या निमित्ताने पतंजली योग परिवार (Patanjali Yog Parivar) नांदेडतर्फे भव्य १११ कुंडी विश्वशांती यज्ञ आयोजित करण्यात आला आहे.

हा धार्मिक व आध्यात्मिक सोहळा गुरुवार, १९ मार्च रोजी अशोक नगर येथील हनुमान मंदिर परिसरात पार पडणार असून कार्यक्रमास आमदार बालाजी कल्याणकर (Balajirao Kalyankar) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या कार्यक्रमात पतंजली योग परिवाराचे योग साधक, योग शिक्षक, कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाची सुरुवात पहाटे ५.३० ते ७.०० या वेळेत हनुमान मंदिर येथे योग वर्गाने होणार आहे. त्यानंतर सकाळी ७.०० ते ७.३० दरम्यान १११ कुंडी विश्वशांती प्रार्थना यज्ञ संपन्न होणार आहे.

यज्ञ समारंभानंतर नववर्षाचे स्वागत करत गुढी पूजन करण्यात येणार असून उपस्थितांना पारंपरिक पेय पन्हा / पछडा प्रसाद म्हणून वितरित करण्यात येणार आहे. या पवित्र सोहळ्यासाठी पतंजली योग परिवार नांदेडतर्फे सर्व योगप्रेमी, साधक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments