नांदेड| जिल्ह्यातील सर्वात अनुभवी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेले नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार तथा लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची संपूर्ण जिल्ह्याची सखोल माहिती व अचूक ज्ञान असलेला नेता आहेत. म्हणून जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी निवड करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याद्यक्ष स्वप्निल इंगळे पाटील यांनी पक्षाचे राष्ट्रीय अद्यक्ष मा अजितदादा पवार यांच्याकड़े पत्राद्वारे केली आहे
जिल्ह्याचा पालकमंत्री हा जिल्हा प्रशासन व राज्य सरकार मधील एक महत्वाचा दुवा म्हणून काम करतात कारण पालकांप्रमाणे ते जिल्ह्याला काय हवे नको ते बघत असतात. जिल्हा प्रशासनला ते मार्गदर्शन करतात. राज्य सरकारच्या व केंद्र सरकारच्या योजनांची प्रशासनामार्फत अमलबजावणी ते करतात. ते जिल्हा नियोजन समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ते जिल्ह्याचे प्रश्न मार्गी लावतात याबरोबरच पालकमंत्री जिल्ह्यातील विविध राज्य सरकारच्या योजना आणि कार्यक्रमांच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवतात.
आणि जिल्ह्याचे प्रशासन कार्यक्षमतेने कार्यरत असल्याची खात्री करतात त्यामुळे प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासारखा अनुभवी नेता व संपूर्ण जिल्हा तसेच शहराची खडाण खडा माहिती असलेला लोकप्रतिनिधी सध्या आमदारांमध्ये नाही त्यामुळे प्रतापराव पाटील चिखलीकरच हे पालकमंत्री पदाचे दावेदार आहेत असेही स्वप्निल इंगळे यांनी म्हटले आहे.