नांदेड| जगातील सर्वात मोठ्या लोकशाहिचा देश-भारत देश.ही निवडणूक भारतातील नागरीकांनीच नाही तर आख्या जगातील नागरिकांनी एक आगळ्या वेगळ्या वळणावरून पादाक्रांत होताना पाहिली.
मी-मी म्हणणार्या निवडणूक विश्लेषकांना सुद्धा निट आंदाज करता आला नाही.सगळ्यांच्या तर्कांना मतदार राजानी हुल्कावनी दिली.खोट ठरविलं!खुद्द उमेद्वारांना सुद्धा मतदात्यांचा आंदाज समजू शकला नाही. सर्वच पक्षाच्या उमेद्वारांनी मतदारांना अनेक प्रकारच्या आमिषांला बळी पाडण्याचा प्रचंड प्रमाणात प्रयत्न केला,पण सर्वच पक्षाच्या उमेद्वाराला पोक्त तथा ज्येष्ठ नागरिक मतदार समूहाने शेवट पर्यंत “मी तुमचाच” या भूमिकेतून पात्र वटविले. मतमोजणीचा निकाल लागे पर्यंत सर्वजनालाच चकित केले असेच म्हणावे लागेल!
.
जे-जे कुणाचा सुफडा साफ करणार होते,त्यांचाच सुफडा ज्येष्ठ नागरिक समूह मतदारानी साफ केला असेच निकालावरूदिसून येऊ शकेल! पोक्त,अनुभव संपन्न ज्येष्ठ मतदार समूहानी सह कुटूंब ठरवून एक गठ्ठा मतदान करून महायुतीला विजयी करून दाखविले.आता देशाचे पंतप्रधान तथा राज्याचे मुख्यमंत्री यांची पाळी तथा वेळ आली आहे.
त्यांनी ज्येष्ठ नागरिक समूहाचे प्रलंबित प्रश्न,लाडके माय-बाप योजना व शेजारिल राज्याप्रमाने गरिब, गरजवंत, निराधार,विधवा व दिव्यांग ज्येष्ठ माय-बाप नागरीकांना प्रतिमहा 3500/- मानधन तथा सन्मान धन देऊन उतराई व्हावे हिच आमची रास्त अपेक्षा आहे. तसेच नवनिर्वाचित खासदारानी व नऊही आमदारांनी ज्येष्ठ नागरिकां कडे आपल्या विजयाचे खरे शिल्पकार तथा माय-बाप म्हणून त्यांचे प्रश्न सभागृहात पोटतिडकिने मांडून शासनाकडून सोडवू घेऊन उपकृत व्हावे एवढेच!