हिमायतनगर, अनिल मादसवार| शहराजवळ घारापुर रस्त्यावर आदिवासी प्रकल्प विभागाकडून मुला-मुलींच्या वस्तीगृहासाठी 24 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, या वस्तीग्रहाचे काम तामसा येथील ठेकेदाराच्या मार्फत केले जात आहे. वस्तीग्रहाचे बांधकाम अत्यन्त नीकृष्ट दर्जाच्या मटेरियलचा वापर करून केलं जात आहे. बांधकामाच्या मजबुतीसाठी क्यूरिंग केली जात नसल्याने भविष्यात येथे वास्तव्य करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता माजी जिल्हा परिषद सदस्य सत्यव्रत ढोले यांनी व्यक्त केली आहे. हि बाब लक्षात घेता होत असलेल्या निकृष्ट बांधकामाची चौकशी करून ठेकेदारावर दंडात्मक कार्यवाही करून एजन्सीचे नाव काळ्या यादीत टाकण्यात यावे अन्यथा याविरोधात आंदोलन उभारावे लागेल असा इशाराही त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे.
हिमायतनगर शहरापासून जवळच असलेल्या तामसा ते फुलसांगवी या राष्ट्रीय महामार्गावर घारापुर फाट्यानजीक आदिवासी प्रकल्प विभागाच्या वतीने मुला – मुलींच्या वसतिगृहाचे बांधकाम तामसा येथील ठेकेदारामार्फत केले जात आहे. अंदाजे २४ कोटी रुप्याच्या निधीतून केले जात असलेल्या इमारतीच्या बांधकामाला मोठा गाजावाजा करून सुरुवात करण्यात आली असली तरी सदर इमारतीच्या कामाचा सुमार दर्जामुळे अंदाजपत्रकाराला बगल दिली जात असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. वस्तीगृहाचे काम सुरु असलेले ठिकाण हे शहरापासून अंदाजे एक किमीहुन अधिक दूर असल्याने मुलींचे वस्तीग्रह शहरालगत करून देण्यात यावे अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य सत्यवृत्त ढोले व आदिवासी समाज बांधवांनी केली असल्याची माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
याबाबत त्यांनी म्हटले आहे की, आम्ही मुलीचे वस्तीग्रह शहरालगत शासनाच्या जागेत करून देण्यात यावे अशी मागणी संबंधित विभागासह राजकीय नेत्याकडे केली आहे. त्यामुळे मुलीच्या वस्तीग्रहाचे काम प्रकल्प विभागाकडून थांबविण्यात आले आहे. तर मुलांच्या वस्तीग्रहाचे काम सुरू असून, या कामातही संबंधित ठेकेदाराकडून थातून मातूरपणा चालविला जात आहे. या वसतिगृह इमारतीच्या बांधकामाची उच्चस्तरीय चौकशी करून अंदाजपत्रकानुसार वस्तीग्रहाचे दर्जेदार बांधकाम करून देण्यात यावे अशी मागणी आम्ही केली असल्याचे ढोले यांनी म्हंटले आहे. मात्र त्यांच्या या मागणीला केराची टोपली दाखवत ठेकेदाराकडून मनमानी पद्धतीने व अंदाजपत्रकाराला बगल देऊन वसतिगृहाचे काम केले जात असून, इमारतीचे काम पाहण्यासाठी एक खाजगी अभियंता लावून ठेकेदार उंटावरून शेळ्या हाकत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
त्यामुळे वसतिगृह इमारतीच्या कामात मध्ये होत असलेला निकृष्टपणा विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतण्याचे शक्यता नाकारता येत नाही. हि बाब लक्षात घेता या कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी आणि कामाचा दर्जा सुधारण्यात यावा अशी मागणी केली आहे. किनवट येथील डेप्युटी इंजिनिअर कलीम व अभियंता धुर्वे यांच्या देखरेखिखाली हे काम होत असले तरी संबंधित अभियंते या कामावर महिना महिना येत नसल्यामुळे ठेकेदार मनमानी पद्धतीने काम उरकून शासनाला चुना लावण्याचा प्रयत्न करत आहे. या कामाची चौकशी नाही झाल्यास या विरोधात आम्हाला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल असेही माजी जी. प. सदस्य सत्यवृत्त ढोले यांनी म्हंटले आहे. ठेकेदाराला आम्ही अगोदरच वसतिगृहाच बांधकाम दर्जेदार पद्धतीने करावे असे सांगितले होते.
मात्र तामसा येथील ठेकेदार यांनी निवडणूकिच्या धामधुमीचा फायदा घेत थातूर मातूर व निकृष्ट बांधकाम करण्यावर भर दिला असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. वसतिगृह बांधकाम करतांना ठेकेदार वसतिगृहाच्या मागून वाहणाऱ्या होळाची माती मिश्रित रेती व हलक्या प्रतीच्या सिमेंटच्या वापर करून शासन व जनतेच्या डोळ्यात डोळ्यात धूळ फेक करून थातुर माथूर काम करत आहे. तसेच राजकीय वरद हस्ताने बांधकामाचे देयके काढण्यासाठी धडपडत आहे. हि बाब लक्षात घेता वस्तीगृह बांधकामासाठी तयार करण्यात आलेल्या अंदाजपत्रकाप्रमाणे बांधकाम करून द्यावे आणि शासन व जनतेच्या डोळ्यात धूळफेक करून थातुर माथूर काम करणाऱ्या ठेकेदारावर दंडात्मक कार्यवाही करून त्या तामसा येथील त्या ठेकेदारांच्या एजन्सीचे नाव काळ्या यादीत टाकण्यात यावे अशी मागणी देखील आदिवासी समाज बांधवाच्या वतीने सत्यव्रत ढोले यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना केली आहे.