HomeनांदेडHimayatnagar Education Department : हिमायतनगर शिक्षण विभागावर भ्रष्टाचाराचे आरोप; मनसेने केली...

Himayatnagar Education Department : हिमायतनगर शिक्षण विभागावर भ्रष्टाचाराचे आरोप; मनसेने केली चौकशीची मागणी तीव्र

हिमायतनगर/नांदेड| नांदेड जिल्हा परिषद अंतर्गत हिमायतनगर तालुक्यातील शिक्षण विभागात भ्रष्टाचार व गैरव्यवहार सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मोंटीसिंग जहागीरदार यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देत शिक्षण विस्तार अधिकारी केशव मेकाले यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

मनसेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनानुसार, काही शिक्षकांना अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी विविध पदांचा पदभार देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यामुळे शासनाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच काही शिक्षकांच्या निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या पेन्शन फाईल्स अडकवून त्यांच्यावर दबाव टाकण्याचे प्रकारही सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याशिवाय विभागातील काही व्यक्तींमार्फत शिक्षक व कर्मचाऱ्यांकडून विविध कामांसाठी पैशांची मागणी होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मागील अनेक वर्षापासून या ठिकाणी काहीजण ठाण मानून बसले असून हा सर्व व्यवहार त्यांच्या मार्फत चालविला जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी मन्सेच्या वतीने करण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणावर आठ दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही मोंटीसिंग जहागीरदार यांनी दिला आहे. या आरोपांमुळे हिमायतनगर शिक्षण विभागातील कारभारावर सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासनाकडून काय..? भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments