HomeनांदेडDRM. Pradeep kamale ; श्री प्रदीप कामळे यांनी नांदेड रेल्वे विभागीय व्यवस्थापक...

DRM. Pradeep kamale ; श्री प्रदीप कामळे यांनी नांदेड रेल्वे विभागीय व्यवस्थापक पदाचा पदभार स्वीकारला

श्री प्रदीप कामळे यांनी नांदेड रेल्वे विभागीय व्यवस्थापक पदाचा पदभार स्वीकारला

नांदेड,अनिल मादसवार। श्री प्रदीप कामळे / IRSME यांनी आज दिनांक 04 एप्रिल 2025 पासून नांदेड विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक पदाचा पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या कार्याने नांदेड विभागातील रेल्वे स्थानकावर सर्व सोयी सुविधा उपलब्ध होतील अशी सर्वांना अपेक्षा आहे.

नवनियुक्त विभागीय व्यवस्थापक श्री प्रदीप कामळे यांनी मेकॅनिकल इंजिनीरिंग मध्ये पदवी प्राप्त केली आहे. श्री प्रदीप कामळे हे भारतीय रेल्वे यांत्रिकी सेवा (इंडियन रेल्वे सर्विस ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्स) 1994 बॅचचे अधिकारी आहेत.

नांदेड येथे विभागीय रेल्वे व्यवस्थापक म्हणून रुजू होण्यापूर्वी श्री प्रदीप कामळे यांनी भारतीय रेल्वे मध्ये आपल्या 30 वर्षाच्या कारकिर्दीत दक्षिण रेल्वे, दक्षिण पूर्व रेल्वे आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये विविध महत्वाच्या पदावर कार्य केले आहे.

आपल्या पहिल्या पोस्टिंग मध्ये श्री प्रदीप कामळे हे सहाय्यक यांत्रिकी अभियंता /मद्रास/ दक्षिण रेल्वे येथे 1998 मध्ये रुजू झाले होते. त्यानंतर त्यांनी कोचिंग डेपो ऑफिसर बिलासपुर येथे कार्य केले. वरिष्ठ यांत्रिकी अभियंता / नागपूर, मुख्य यांत्रिकी अभियंता /बिलासपुर, मुख्य कार्यशाळा व्यवस्थापक/ मोतीबाग वॅगन रिपेयर वर्कशॉप /रायपूर, मुख्य रोलिंग स्टॉक अभियंता / कोचिंग/ बिलासपूर येथे कार्य केले.

श्री प्रदीप कामळे हे प्रतिनियुक्ती वर मुख्य दक्षता अधिकारी / मोईल / नागपूर येथे जवळपास 3 वर्ष कार्यरत होते. नांदेड येथे विभागीय रेल्वे व्यवस्थापक पदी रुजू होण्यापूर्वी ते बिलासपुर येथे मुख्य यांत्रिकी अभियंता / डीजेल आणि आपत्ती व्यवस्थापन/दक्षिण पूर्व मध्य रेल्वे येथे कार्यरत होते.

श्री प्रदीप कामळे यांनी भारतीय रेल्वेच्या इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग/ जमालपूर, INSEAD / सिंगापूर आणि इंटरनॅशनल सेंटर फॉर लीडरशिप इन फायनान्स (ICLIF)/ मलेशिया यासारख्या प्रतिष्ठित रेल्वे संस्थांमध्ये प्रशिक्षण घेतले आहे.

मोतीबाग वर्कशॉपमध्ये बायो टॉयलेट आणि इनोकुलम जनरेशन प्लांटच्या प्रोटोटाइप डेव्हलपमेंट कामात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या काळात मोतीबाग वर्कशॉपमध्ये नॅरोगेज ते ब्रॉडगेज रोलिंग स्टॉक देखभालीचे कामही करण्यात आले. नागपूर विभागात त्यांच्या कार्यकाळात मोतीबाग आणि नागपूर येथील नॅरोगेज संग्रहालयांचा विकासही करण्यात आला. दिनांक 21 मार्च , 2023 रोजी नांदेड विभागात रुजू झालेल्या श्रीमती नीति सरकार, IRAS यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला आहे.

 

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments