HomeनांदेडSaint Shrestha Dnyaneshwar Mauli : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त ‘ज्ञानियांचा...

Saint Shrestha Dnyaneshwar Mauli : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त ‘ज्ञानियांचा राजा – मोगरा फुलला’ कार्यक्रम

नांदेड| संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासनसांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने “ज्ञानियांचा राजा – मोगरा फुलला” हा विशेष आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.हा कार्यक्रम बुधवार, दि. १८ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता कुसुम सभागृह (व्ही.आय.पी. रोड) येथे संपन्न होणार आहे.

संत ज्ञानेश्वर माऊली यांनी भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी) या महान ग्रंथाद्वारे अध्यात्म, समता, प्रेमभाव आणि मानवतेचा संदेश सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवला. त्यांच्या विचारांनी महाराष्ट्रातील वारी परंपरा, संत साहित्य आणि समाजातील ऐक्यभाव अधिक दृढ केला आहे. त्यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित हा कार्यक्रम संत परंपरेच्या स्मरणार्थ तसेच अध्यात्मिक विचारांच्या प्रसारासाठी विशेष महत्त्वाचा ठरणार आहे.

या कार्यक्रमात प्रख्यात व्याख्याते गणेश शिंदे (स्वास्थ्य व समाज विषयक प्रबोधनकार) यांचे संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या अध्यात्मदृष्टिकोनावर, समाजकार्यातील त्यांच्या प्रभावावर तसेच आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या विचारांवर आधारित विशेष प्रबोधनपर सादरीकरण होणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित हा कार्यक्रम आशिष शेलार (सांस्कृतिक कार्य मंत्री, महाराष्ट्र) तसेच डॉ. किरण कुलकर्णी (सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे.

नांदेड व परिसरातील नागरिक, विद्यार्थी, संत साहित्य अभ्यासक तसेच रसिकांनी या विशेष कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून या प्रेरणादायी आध्यात्मिक-सांस्कृतिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीराम पांडे (संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई) यांनी केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments