HomeनांदेडSangewar DYSP Jagtap ; लोह्यात उपविभागीय अधिकारी संगेवार डीवायएसपी जगताप याच्या उपस्थितीत...

Sangewar DYSP Jagtap ; लोह्यात उपविभागीय अधिकारी संगेवार डीवायएसपी जगताप याच्या उपस्थितीत शांतात समितीची बैठक संपन्न

लोहा l भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती व रामनवमी निमित्त लोह्याच्या पोलीस ठाण्यात उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, डीवायएसपी अश्विनी जगताप याचा उपस्थितीत शांतता समितीची बैठक घेण्यात आली.पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांच्या पुढाकाराने ही बैठक घेण्यात आली

शांतता समिती बैठकीच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी व नगर परिषदेच्या प्रशासक अरुणा संगेवार होत्या .कंधार उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी जगताप, नायब तहसीलदार पाठक, पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने, सहायक पोलीस निरीक्षक केदार, पोलीस उपनिरीक्षक पाटील, माजी उपनगराध्यक्ष दता वाले, माजी नगरसेवक करीम शेख,पंचशील कांबळे भास्कर पाटील , गंगाधर महाबळे डीबी चे सदाशिव जामकर, गिरे, माजी पाणीपुरवठा सभापती अप्पराव पवार, पत्रकर सुरेश जोंधळे, हरिहर धुतमल,गोविंद कदम, इमाम लदाफ , निहाल अहमद , अनिल गायकवाड डी एन कांबळे, यासह भीम जयंती मंडळाचे सदस्य , ठाण्याअंतर्गत गावातील पोलीस पाटील , विविध गावचे भीम।जयंती मंडळ अध्यक्ष याची उपस्थिती होती.

उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सोहळा शांतात साजरा करावा डीजे मुक्त-दारू मुक्त -धिंगाणा मुक्त म्हणजे “थ्रीडी “मुक्त जयंती करावी तसेच मिरवणूक मार्गात येणारे विद्युत तारा, बांधकाम साहित्य तात्काळ उचलून घेण्याचा सूचना नगर परिषदेला दिल्या.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची आज गरज असून जयंती उत्सव मोठ्या आनंदाने एकोप्याने साजरा करावा असे अहवान केले .उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी जगताप यांनी जयंती तसेच राम नवमी विषयी मार्गदर्शक सूचना सांगितल्या तसेच वाचन उपक्रम , विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत , डीजे मुक्त मिरवणूक असे विविध उपक्रम राबवावेत एकच मिरवणूक निघते ही अतिशय स्तुत्य बाब आहे.

असे त्यांनी सांगितले पोलीस निरीक्षक आयलाने यांनी मार्गदर्शन केले. डीबीचे प्रमुख सदाशिव जामकर यांनी बॅनर बाबत महत्वाच्या सूचना केल्या. यावेळी भास्कर पाटील पवार, पंचशील कांबळे, हरिहर धुतमल, गंगाधर महाबळे, डी एन कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. लोहा सार्वजनिक भीम।जयंतीनिमित्त उपविभागीय अधिकारी संगेवार, डीवायएसपी जगताप, पीआय आयलाने यांचा सत्कार करण्यात आला.

भीम जयंती आयोजन समितीचेभारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सरचिटणीस रत्नाकर महाबळे गंगाधर महाबळे पंचशील कांबळेअनिल धुतमल, सतीश निखाते, केतन खिल्लारे, निखिल महाबळे, बाळू थोरात, धोंडिबा यानभुरे, सिद्धार्थ महाबळे लखम।महाबळे यासह मंडळाचे सदस्य उपस्थित होते.शांतात समितीच्या बैठकी नंतर पोलीस पाटील यांची बैठक दोन्ही अधिकारी यांनी घेतल्या .जयंती सोहळा व रामनवमी उत्साहात साजरी करण्याचे अहवान प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments