Sangewar DYSP Jagtap ; लोह्यात उपविभागीय अधिकारी संगेवार डीवायएसपी जगताप याच्या उपस्थितीत शांतात समितीची बैठक संपन्न
लोहा l भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती व रामनवमी निमित्त लोह्याच्या पोलीस ठाण्यात उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, डीवायएसपी अश्विनी जगताप याचा उपस्थितीत शांतता समितीची बैठक घेण्यात आली.पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांच्या पुढाकाराने ही बैठक घेण्यात आली
शांतता समिती बैठकीच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी व नगर परिषदेच्या प्रशासक अरुणा संगेवार होत्या .कंधार उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी जगताप, नायब तहसीलदार पाठक, पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने, सहायक पोलीस निरीक्षक केदार, पोलीस उपनिरीक्षक पाटील, माजी उपनगराध्यक्ष दता वाले, माजी नगरसेवक करीम शेख,पंचशील कांबळे भास्कर पाटील , गंगाधर महाबळे डीबी चे सदाशिव जामकर, गिरे, माजी पाणीपुरवठा सभापती अप्पराव पवार, पत्रकर सुरेश जोंधळे, हरिहर धुतमल,गोविंद कदम, इमाम लदाफ , निहाल अहमद , अनिल गायकवाड डी एन कांबळे, यासह भी...
