नांदेडधार्मिक

Dhamma Melawa : हरडफ येथे ५३ वा धम्म मेळावा उत्साहात संपन्न; समाज मंदिर उद्घाटन व सभामंडप भूमिपूजन

हरडफ (प्रतिनिधी) भगवान गौतम बुद्धांच्या शांती, करुणा व प्रज्ञेचा संदेश समाजात रुजविणाऱ्या ५३ व्या धम्म मेळाव्याचे हरडफ येथे उत्साहात आयोजन करण्यात आले. न हिंसा, करुणा आणि शांती हाच बुद्धांचा धम्म असल्याचे प्रतिपादन यावेळी करण्यात आले. विचारांची आणि माणुसकीची ऊर्जा देणारा हा धम्म मेळावा समाजात मानवता व बंधुता नांदविणारा ठरला.

या प्रसंगी समाज मंदिराचे उद्घाटन (निधी ०९ लाख रुपये) तसेच सभामंडपाचे भूमिपूजन (निधी ४० लाख रुपये) अशा महत्त्वपूर्ण विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले. या विकासकामांमुळे परिसरातील सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना चालना मिळणार आहे.

FB IMG 1770006888187 Dhamma Melawa : हरडफ येथे ५३ वा धम्म मेळावा उत्साहात संपन्न; समाज मंदिर उद्घाटन व सभामंडप भूमिपूजन

कार्यक्रमास संभाराव लांडगे (मा. जि. प. सदस्य), पंजाबराव पा. कदम (मा. जि. प. सदस्य), संदेश पा. हडसनीकर (युवा जिल्हाप्रमुख), बाबूसराव कदम (मा. प. स. सभापती), अशोकराव पवार, पी. के. कदम, प्रा. शिवाजी जाधव, रुपेश तंत्रे (सरपंच), शरद पा. हरडफकर, गणेशराव पिसाळ, आकांक्षा वायवळ, सौ. वाठोरे (सरपंच), मुनेश्वर नगरसेविका आदी मान्यवर उपस्थित होते.

FB IMG 1770006879412 Dhamma Melawa : हरडफ येथे ५३ वा धम्म मेळावा उत्साहात संपन्न; समाज मंदिर उद्घाटन व सभामंडप भूमिपूजन

याशिवाय मुंबई व अकोला येथील सुप्रसिद्ध गायक, तसेच गावातील नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. धम्म मेळाव्याच्या माध्यमातून समाजात सकारात्मक विचार, समता व बंधुतेचा संदेश अधिक दृढ झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!