HomeनांदेडDiesel Limits Demand Farmers : डिझेल मर्यादेमुळे शेतकऱ्यांची अडचण; ट्रॅक्टरसाठी ३-४ हजार...

Diesel Limits Demand Farmers : डिझेल मर्यादेमुळे शेतकऱ्यांची अडचण; ट्रॅक्टरसाठी ३-४ हजार रुपयांचे डिझेल देण्याची मागणी

हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार|  राज्यात वाढत्या डिझेल दरांमुळे शेतकऱ्यांच्या मशागतीच्या कामांवर मोठा परिणाम होत असल्याचे चित्र दिसत आहे. सध्या ट्रॅक्टरमध्ये मर्यादित प्रमाणात दिले जाणारे डिझेल अपुरे पडत असल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, सध्या १५०० रुपयांच्या डिझेलमध्ये शेतीची कोणतीच कामे पूर्ण होत नाहीत. नांगरणी, पेरणी, मशागत यांसारखी महत्त्वाची कामे अर्धवट राहतात. त्यामुळे ट्रॅक्टरसाठी किमान ३ ते ४ हजार रुपयांचे डिझेल देण्याचा निर्णय शासनाने घ्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

विशेष म्हणजे, शेतात काम सुरू असताना ट्रॅक्टर बंद पडल्यास तातडीने डिझेल उपलब्ध होत नाही. डब्यातून डिझेल देण्याचीही सुविधा अनेक ठिकाणी नसल्याने शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन ट्रॅक्टरसाठी डिझेल मर्यादा वाढवावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. अन्यथा शेतीची कामे ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments