Homeक्राईमPolice Action : उस्माननगर पोलिसांची मोठी कामगिरी; अल्पवयीन मुलीचा शोध लावून दिले...

Police Action : उस्माननगर पोलिसांची मोठी कामगिरी; अल्पवयीन मुलीचा शोध लावून दिले पालकांच्या ताब्यात

नांदेड| उस्माननगर पोलीस स्टेशनच्या पथकाने तत्परता दाखवत अल्पवयीन मुलीचा शोध लावून तिला सुरक्षितपणे पालकांच्या ताब्यात दिल्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

पोलीस अधीक्षक कार्यालयाने जारी केलेल्या  माहितीनुसार, दि. ३० जानेवारी २०२६ रोजी संबंधित अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार उस्माननगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम सुरू केली.

पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेलच्या मदतीने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे शोधकार्य राबविण्यात आले. या अथक प्रयत्नांतून पोलिसांनी संबंधित मुलीचा ठावठिकाणा शोधून काढत तिला सुरक्षितपणे ताब्यात घेतले.

यानंतर मुलीला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले असून, या प्रकरणी संबंधित दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे. या यशस्वी कारवाईमुळे उस्माननगर पोलिसांची तत्परता व कार्यक्षमता पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून नागरिकांकडून या कामगिरीचे कौतुक होत आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments