Homeआरोग्यHealth News : कायाकल्प कार्यक्रमांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र बारूळ येथे एक्सटर्नल असेसमेंट...

Health News : कायाकल्प कार्यक्रमांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र बारूळ येथे एक्सटर्नल असेसमेंट संपन्न

नांदेड| कॉलिटी अश्युरन्स अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कायाकल्प कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्राथमिक आरोग्य केंद्र बारूळ (ता. कंधार, जि. नांदेड) येथे एक्सटर्नल असेसमेंट यशस्वी-रीत्या पार पडले. लातूर विभागीय असेसर टीमने २४ मार्च रोजी सखोल पाहणी करत विविध विभागांचा आढावा घेतला.

या पाहणीसाठी डॉ. हरेश्वर सूळे (वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र वाढवना, जि. लातूर) आणि डॉ. श्यामसुंदर लोखंडे (गुणवत्ता आश्वासन समन्वयक, जि. नांदेड) उपस्थित होते. त्यांचे स्वागत वैद्यकीय अधिकारी डॉ. एच. के. साखरे व डॉ. सागर तातोडे यांनी केले.

IMG 20260325 WA0061 Health News : कायाकल्प कार्यक्रमांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र बारूळ येथे एक्सटर्नल असेसमेंट संपन्न

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश गवाले यांच्या मार्गदर्शनाखाली ही पाहणी पार पडली. यावेळी असेसर टीमने रुग्णालयाच्या बाह्य परिसरातील स्वच्छता, आपत्कालीन कक्ष, आंतररुग्ण विभाग, प्रसूतीगृह, शस्त्रक्रिया विभाग, लसीकरण विभाग तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना विभागाची पाहणी केली.

तसेच बाह्यरुग्ण विभाग, औषधी विभाग, विविध नोंदी, अहवाल व कायाकल्प चेकलिस्टनुसार आवश्यक बाबींची तपासणी करण्यात आली. आयुष उद्यानासह इतर सुविधा पाहून टीमने समाधान व्यक्त केले. यानंतर सर्व डॉक्टर, कर्मचारी व कार्यालयीन कर्मचाऱ्यांना डॉ. हरेश्वर सूळे व डॉ. श्यामसुंदर लोखंडे यांनी सखोल मार्गदर्शन केले. आरोग्य सहाय्यक श्री येलुरे यांनी टीमचे आभार मानत कमी वेळेत उत्कृष्ट तयारी केल्याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

IMG 20260325 WA0058 Health News : कायाकल्प कार्यक्रमांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र बारूळ येथे एक्सटर्नल असेसमेंट संपन्न

या कार्यक्रमास डॉ. एच. के. साखरे, डॉ. दीक्षा, डॉ. सागर, डॉ. मुदे, डॉ. अंबिका लाटकर, डॉ. दिग्रे, डॉ. मोहिते, तसेच इतर आरोग्य अधिकारी, कर्मचारी, आरोग्य सेविका, आशा व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकूणच, या एक्सटर्नल असेसमेंटमुळे प्राथमिक आरोग्य केंद्र बारूळ येथील आरोग्य सेवा अधिक गुणवत्तापूर्ण व रुग्णाभिमुख होण्यास मदत होणार आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments